एक्स्प्लोर

नागपुरात ट्रकमधून तब्ब्ल चार कोटी रुपयांची सिगारेट लंपास

नागपूर जिल्ह्यात सिगारेट चोरीचं एक वेगळं प्रकरण समोर आलाय. या प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी भोपाळ ते रायपूर दरम्यान वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून थोडी थोडकी नव्हे तर तब्ब्ल चार कोटी रुपयांची सिगारेट लंपास केली आहे.

नागपूर : जिल्ह्यात सिगारेट चोरीचा एक आगळं वेगळं प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी भोपाळ ते रायपूर दरम्यान वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून थोडी थोडकी नव्हे तर तब्ब्ल चार कोटी रुपयांची सिगारेट लंपास केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिस याचा तपास करत आहे. भोपाळवरुन कोट्यवधींची सिगारेट घेऊन रायपूरच्या दिशेने निघालेले हे ट्रक/कंटेनर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील नांदा शिवारात बेवारस स्थितीत आढळले होते. तेव्हा प्रकरणाचे सत्य समोर आले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून एका ट्रक मालकाने पोलीसांना संपर्क साधून त्यांचे कोट्यवधींची सिगारेट वाहून नेणारे (सीजी 04 एमटी 5271)क्रमांकाचे ट्रक बेपत्ता असल्याचे कळवले. तेव्हा नांदा परिसरात बेवारस उभे असलेले ट्रक सिगारेट वाहतूक करत होते आणि त्याच्यातून चार कोटींची सिगारेट लंपास झाल्याचा खुलासा झाला. हेही वाचा - बिग बींसमोर सिगरेट प्यायलेली चालेल? आमीरने मागितला शाहरुखचा सल्ला ट्रकचे अपहरण करुन कोट्यवधींची लूट : मध्यप्रदेशातील रायेसन मधील रिलायबल सिगारेट एन्ड टोबेको इंडस्ट्रीज मधून हे ट्रक सिगारेटचे 656 मोठे बॉक्स घेऊन रायपूरच्या दिशेने निघाले होते. मात्र, निश्चित वेळेला रायपूरला न पोहोचता हे ट्रक बेपत्ता झाले होते. मार्गावर सर्वत्र शोध घेतल्यानंतर ते नागपूर जिल्ह्यात नांदा परिसरात निर्जन ठिकाणी बेवारस उभे आढळले. पोलीसांनी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 18 डिसेंबरला दोन महिंद्रा एक्सयूव्ही वाहनांनी संबंधित ट्रकचा पाठलाग करुन त्याचे अपहरण केले. त्यानंतर दोन रिकामे ट्रक आणून एका निर्जन ठिकाणी चार कोटींची सिगारेट त्या दोन ट्रकमध्ये लोड केली. त्यानंतर या ट्रक अमरावती मार्गे भुसावळला नेल्याचे समजले आहे. त्यामुळे रायपूरवरुन निघालेली आणि भोपाळला जाणारी चार कोटींची सिगारेट चोरुन भुसावळला कोणी नेली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. हेही वाचा - सिगरेट न दिल्याने कल्याण स्टेशनबाहेर मद्यधुंद तरुणींचा गोंधळ हेही वाचा - आधी बिडी द्या, खड्डयातून बाहेर काढलेल्या आजोबांची तलफ! Galor Gang | Wooden Slingshot | काच फोडून कारची चोरी, औरंगाबादमध्ये टोळी गजाआड | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget