Chandrapur Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. या पाचही मतदासंघातील एकूण 97 उमेदवार रिंगनाणात होते. तर या साऱ्यांना आता 4 जून म्हणजेच तब्बल 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशातच पूर्व विदर्भात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Election 2024) 67.57 टक्के मतदान झाल्याची अंतिम टक्केवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलीय. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढती मतदानाची टक्केवारी लक्षात घेता याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना होतो, की भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


सुधीरभाऊ की प्रतिभा धानोरकर, गुडन्यूज कुणाला? 


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. मात्र त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र त्यांच्या विरोधात त्यांच तोडीचे उमेदवार म्हणून भाजपने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे.  चंद्रपूर मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती. त्यामुळे एकप्रकारे काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार की काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्यानंतर प्रतिभा धानोरकर काँग्रेचा गड कायम राखणार, हे पाहणे उतसुकेतेचे ठरणार आहे.  


उपराजधानीत किती टक्के मतदान? 


उपराजधानी नागपूर मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या या दिग्गज नेत्याच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नागपुरात एकूण 54.11 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे पूर्व विदर्भात 55.76 टक्के मतदान झाले आहे. तर दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये 53.03 टक्के , दक्षिण नागपूरमध्ये 52.80 टक्के मतदान, पूर्व नागपूरमध्ये 55.76 टक्के मतदान, मध्य नागपूर मध्ये 54.02, पश्चिम नागपूरमध्ये 53.71 टक्के मतदान, उत्तर नागपूरमध्ये 54.11 टक्के मतदान, असे एकूण  54.11 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. त्यामुळे आता नागपुरकरांचा कौल नेमका कोणाला असणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या