Nagpur Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या शेवटाला आता अवघे काही मिनिटे शिल्लक राहिले आहेत. नागपूरसह (Nagpur) पूर्व विदर्भातील (Vidarbha) एकूण पाच मतदारसंघात आज निवडणुकांची रणधुमाळी रंगली असून अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असतांना पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हेच मतदान केवळ 54.85 टक्के इतके मतदान झाले आहे. तर या पाच मतदारसंघात सर्वात कमी नागपुरात 47. 91 टक्के तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 64.91 इतके मतदान झाले आहे.
निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी या अनुषंगाने प्रशासनाने मतदानप्रक्रियेची पूर्ण तयारी केली असल्याचा दावा करण्यात आला होता. तर उपराजधानीत 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासाने ठेवले होते. मात्र, एकीकडे उन्हाचा तडाखा एक कारण असले तरी, अनेकांना मतदारयादीत आपले नाव न मिळालेने मतदानाला मुकावे लागल्याचे बोलले जात आहे.
गडचिरोलीत सर्वाधिक तर उपराजधानीची पिछाडी
आज सकाळी 7 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली असून विदर्भातील (Vidarbha) उष्णतेचा पारा लक्षात घेता सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावण्यास मतदारांचा कल दिसला. मात्र, प्रखर उष्णतेचा वाढता पारा लक्षात घेता, दुपारच्या सत्रात लोकांनी मतदान करणे टाळले आहे. आता शेवटच्या टप्पात नेमकी मतदानाची काय आकडेवारी येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान झाले आहे. यात रामटेक येथे 52.38 टक्के, नागपूर येथे 47.91 टक्के, भंडारा- गोंदिया 56.87 टक्के, गडचिरोली- चिमूर येथे सर्वाधिक 64.95 टक्के आणि चंद्रपूर येथे 55.11 टक्के इतके मतदान झाले आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी
पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. यात रामटेक येथे 40.10 टक्के, नागपूर येथे 38.43 टक्के, भंडारा- गोंदिया 45.88 टक्के, गडचिरोली- चिमूर येथे 55. 79 टक्के आणि चंद्रपूर येथे 43. 48 टक्के मतदान झाले आहे.
अनेक दिग्गजांनी केले मतदान
नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी मतदानाल उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात सुमारे 13 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर भंडाऱ्यात 7.22 टक्के मतदान झाले आहे. सोबतच अनेक दिग्गज नेते मंडळीनीही सकाळच्या सुमारास आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळच्या सुमारास सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजवला आहे. यावेळी बोलताना अधिका-आधिक मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील धरमपेठ येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मतदान सुरू होताच संरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील मतदान केलं. नागपूरच्या भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रावर भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
इतर महत्वाच्या बातम्या