नागपूरः सध्या धकाधकीचे जीवन, जीवघेण्या स्पर्धेतून जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. यामुळे मुलींच्या लग्नाला होणारा विलंब, पर्यायाने गरंभधारणेस उशीर. त्यात स्तनपान न करण्याची भावनाही बळावलेली. तसेच आनुवंशिकता यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका प्रचंड वाढला आहे. मेडिकलच्या कॅन्सरच्या 2 हजार 300 रुग्णांची नोंद झाली. यापैकी तब्बल 690 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) झाल्याचे धक्कादायक निदान पुढे आले.


मेडिकलमध्ये 2021-2022मध्ये 2 हजार 300 नवीन रुग्णांची नोंद झाली. विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये ठेवून उपचार केले जातात. गतवर्षी नोंदणीकृत कॅन्सरच्या रुग्णांपैकी 30 टक्के अर्थात 690 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे आढळले. विशेष म्हणजे असे की, त्यापैकी 10 टक्के म्हणजेच 230 युवती 20 ते 30 वयोगटातील आहेत.


उर्वरित 20 टक्के म्हणजे 460 महिला या तिशीनंतरच्या आहेत. ब्रेस्ट कॅन्सरसाठी वय, कॅन्सरचा पूर्वेतिहास, परिवारात कुणास असेल वा आनुवंशिकता, किरणतोत्सार प्रादुर्भाव, लठ्ठपणा, लवकर पाळी येणे, उशिरा रजोनिवृत्ती, उशिरा गर्भधारणा होणे, स्तनपान न करणे, रजोनिवृत्तीनंतरची हॉर्मोनल थेरपी, मद्यपान या बाबी कारणीभूत असतात. वयाच्या 35 नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे. कॅन्सरची जोखीम असेल तर वयाच्या पंचेविशीनंतर मॅमोग्राफी करणे हितावह आहे. असे रेडिओथेरपी विभाग प्रमुख डॉ. अशोक कुमार दिवाण यांनी सांगितले.


Coronavirus Case : कोरोना पुन्हा वाढतोय; गेल्या 24 तासांत 12 हजारांहून अधिक रुग्ण, तर पॉझिटिव्हिटी दर 3.48 टक्क्यांवर


ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे



  • ब्रेस्ट किंवा काखेत गाठ येणे

  • ब्रेस्टच्या त्वचेची जाडी वाढणे

  • आकार बदलणे

  • त्यातून रक्तास्त्राव होणे

  • ब्रेस्टच्या त्वचेला लालसरपणा येणे


ब्रेस्ट कॅन्सर टाण्यासाठी



  • मद्यपान टाळणे

  • मर्यादित हार्मोनल थेरपी

  • आरोग्यदायी जीवनशैली

  • नियमित व्यायाम

  • संतुलित आहार

  • लठ्ठपणा नियंत्रणात

  • फास्ट फूडपासून दूर

  • चरबीयुक्त पदार्थ टाळण


Gold Rate Today : ग्राहकांना सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी! काय आहे 22 कॅरेट सोन्याचा दर?


तज्ज्ञ म्हणतात...


वयाच्या 35 नंतर नियमित ब्रेस्ट तपासणी केली तर त्यामध्ये होणारे बदल सहजतेने कळतील. जर ब्रेस्टमध्ये गाठ आली, रक्त येत आहे किंवा ब्रेस्टमध्ये कुठलाही बदल झाला तर तातडीने कॅन्सर रोग शल्यचिकित्सकांचा सल्ला घ्यावा. त्यामुळे वेळेत कॅन्सरचे निदान शक्य होईल. उपचारातून सामान्य जीवन जगता येईल. आनुवंशिकता, आधुनिक जीवनशैली वाढलेल्या कॅन्सरला कारणीभूत असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची गरज आहे.


Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण आवश्यक - मोहन भागवत