एक्स्प्लोर

Nagpur News Update : ऊर्जा मंत्र्यांच्या मुलाचा पोलिसांवर दबाव ; भाजपचा आरोप

ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा मुलगा कुणाल राऊत पोलिसांवर दबाव आणत आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

Nagpur News Update : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा मुलगा कुणाल राऊत पोलिसांवर दबाव आणत आहे. त्यांच्या दबावामुळेच नागपुरात भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा आणि इतर भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. 

जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकारी पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल राऊत यांच्या दबावात काम करत आहेत. भाजप कार्यालयावर कालच्या हल्ल्याच्या घटनेबद्दल दोषी काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल करून त्यांना अटक करत नाहीत, तोपर्यंत भाजपचे कार्यकर्ते रोज जरीपटका पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण करतील असे देखील भाजपने जाहीर केले आहे. या प्रकरणी पोलिसांवर भाजप नेत्यांचा दबाव असून पोलीस या दबावात काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने देखील केला आहे. पोलिसांनी निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

सुगत नगर आणि जवळपासच्या वस्तीतील नागरिकांच्या समस्या स्थानिक नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांना सांगण्यासाठी काल काँग्रेसचे स्थानिक नेते बाबू खान यांच्या नेतृत्वात काही महिला काँग्रेस कार्यकर्त्या कुकरेजा यांच्या जरीपटका परिसरातील कार्यालयात गेल्या होत्या. तेथे सुरुवातीला दोन्ही पक्षात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर हाणामारीही झाली. यात कुकरेजा यांच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. काँग्रेसने देखील भाजप कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला होता.

भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी काँग्रेस कार्यकर्ता बाबूखान सोबत आलेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करून कार्यालयातील फर्निचरच्या तोडफोडीचा आरोप केला होता. दोन्ही पक्षांनी काल जरीपटका पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी नोंदविल्या होत्या.

पोलिसांनी काल रात्री दोन्ही बाजूंच्या तक्रारी ऐकून भाजप नगरसेवकाच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर काँग्रेस नेते बाबू खान विरोधात मारहाण, विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र आता दोन्ही पक्षांनी या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईला राजकीय दबावाने केलेली कारवाई संबोधून एकमेकांवर आरोपांची मालिका सुरू केली आहे.

महत्वाच्या  बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, चालकाला अटक 
नागपुरात भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, चालकाला अटक 
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Devendra Fadnavis : डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget