Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) प्रशासनाने पदव्युत्तर विभागांना स्वायत्त दर्जा दिला आहे. यानंतरही पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नसल्याचे (Less Admission) चित्र आहे. प्रवेश परीक्षा आणि प्रक्रियेला होणाऱ्या विलंबामुळे यंदा विज्ञान शाखेव्यतिरिक्त अन्य विभागांत 40  ते 50 टक्के जागा आजूनही रिक्तच आहेत. विद्यार्थी उपलब्ध नसल्याने दिवाळी तोंडावर येऊनही प्रवेश प्रक्रिया सुरूच ठेवावी लागली आहे.


विद्यापीठात सुमारे 39 पदव्युत्तर विभाग (Post Graduate Department) आहेत. यंदा प्रवेशासाठी सीईटी (CET) घेण्यात आली. जूनमध्येच नोंदणीपासून प्रक्रिया सुरू झाली होती. ऑगस्टमध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना यादीच्या आधारे विभागांमध्ये प्रवेश घ्यायचा होता. सुरुवातीच्या टप्प्यात विज्ञान शाखेत प्रवेश झाले होते, मात्र ह्युमिनिटी विभागात (Department of Humanities) अजूनही जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे विद्यापीठाने 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश देण्यास सांगितले आहे. सध्या विज्ञान शाखेच्या (Science Branch) विनाअनुदानित अभ्यासक्रमातही जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येते.


विभागाच्या प्राध्यापकांवर जबाबदारी


प्राप्त माहितीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधित विभागाच्या प्राध्यापकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोणत्या विभागात किती प्रवेश झाले याची माहिती त्यांच्याकडेच उपलब्ध आहे. तरी प्राध्याकांकडून अद्याप उपलब्ध जागा आणि प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नाही आहे.


अनेक विभागांमध्ये फख्त पंधरा विद्यार्थ्यांचे प्रवेश


रिक्त जागांची माहिती घेण्यासाठी विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता माहिती मिळू शकली नाही. अधिकारी एकाकडून दुसऱ्याकडे जबाबदारी ढकलत आहेत. यावरून विद्यापीठात परस्पर समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट आहे. विभागांना स्वायत्त दर्जा देण्यात आला, मात्र आजतागायत जागा रिक्त आहेत. विशेषत: ह्युमॅनिटीमध्ये अनेक जागा रिक्त राहतील. प्रत्यक्षात विद्यापीठाने या दिशेने कधीच लक्ष दिले नाही. विद्यार्थ्यांना विभागांकडे आकर्षित करण्यासाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. काही विभागात तर आता 10-15 पेक्षा जास्त प्रवेशही झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी अर्धवेळ आणि नियमित प्राध्यापकांची संख्याही जवळपास सारखीच आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


CBSE Board Exam 2023 : यंदा सीबीएसई बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारीपासून; वेळापत्रक डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार


Job Majha : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. आणि 'या' ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI