CBSE Board Exam 2023 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE Board Exam 2023) डिसेंबरमध्ये इयत्ता दहावी (CBSE 10th Board Exam 2023) आणि बारावी बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक (CBSE Board Exam Date Sheet 2023) जाहीर करणार आहे. तसेच, सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या (CBSE 12th Board Exam 2023) परीक्षा कोरोनापूर्वीच्या (Coronavirus) अभ्यासक्रमावर आधारित असतील. कोविडमुळे CBSE नं गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती. सीबीएसईचे परीक्षा (CBSE Exams) नियंत्रक संयम भारद्वाज यांनी इंडियन एक्सप्रेसला याबाबत माहिती दिली आहे.


संयम भारद्वाज यांच्या मते, सीबीएसई बोर्ड परीक्षांची वेळापत्रक डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. ते अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर प्रसिद्ध केलं जाईल. ते म्हणाले की, सत्र 2022-23 साठी परीक्षेचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2019-20 प्रमाणेच असेल. यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत अफवा पसरल्यानंतर भारद्वाज यांनी या गोष्टींसंदर्भात माहिती दिली आहे. 


यंदा CBCE परीक्षा एकाच वेळी 


गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टर्मच्या परीक्षेचं आयोजन गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्यात आलं होतं. तर टर्म-2 ची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू झाली होती. यावर्षी सीबीएसईनं 22 जुलै रोजी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. इयत्ता बारावी मध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावी मध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.


यंदा 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा 


दरम्यान, सध्या देशासह जगात कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भावात झालेली घट लक्षात घेता,  CBSE ने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI