एक्स्प्लोर

Nagpur Crime : दारुच्या नशेत आईवरुन शिवीगाळ, रिक्षाचालकाकडून तरुणाचा निर्घृण खून

Nagpur Crime : राजूने सतीशला आईवरुन शिवी दिली. त्यामुळे तो चिडला. दोघांमध्येही हाणमारी झाली. यावेळी त्याने राजूच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी घटनास्थळी कोणीही नव्हते.

Nagpur Crime : आईवरुन शिवी दिल्याच्या रागातून रिक्षाचालकाने तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना नागपुरात घडली. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केलं. महत्त्वाचं म्हणजे रिक्षाचालक आणि मृत तरुण दोघेही दारुच्या नशेत होते. प्रकाश उर्फ राजू लल्लू धकाते (वय 28 वर्षे, विनोवा भावेनगर) असे मृताचे नाव असून सतीश पांडुरंग मुळे (वय 27 वर्षे) असे मारेकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार दारु प्यायल्यानंतर झालेल्या वादातून एका ई-रिक्षाचालकाने तरुणाचा बळी घेतला. विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली. हा थरार यशोधरा पोलिस ठाण्यांतर्गत (Yashodhara Nagar Police Station) वीटभट्टी परिसरात घडला.

दोघांमध्ये वाद अन् हाणामारी

सतीश हा ई-रिक्षा चालक असून, तो गुन्हेगारी (Criminal) प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर मारहाणीचा गुन्हाही दाखल आहे. मृत राजू हा बेरोजगार आहे. बुधवारी (28 सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास दोघेही वीटभट्टी चौका जवळील (Vitabhatti chowk) मैदानात दारु पीत होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. राजूने सतीशला आईवरुन शिवी दिली. त्यामुळे तो चिडला. दोघांमध्येही हाणमारी झाली. यावेळी त्याने राजूच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी घटनास्थळी कोणीही नव्हते.

स्वतः गेला पोलिस ठाण्यात

घटनेनंतर सतीश घाबरला आणि त्याने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तोपर्यंत राजू जिवंत होता. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Died during treatment) झाला. यानंतर पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले.

दारु उतरल्यावर सांगितले खरे कारण

पोलीस ठाणे गाठल्यावर सतीशने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत राजूला ओळखण्यास नकार दिला. तसेच राजू त्याला वाटेत भेटला होता. वनदेवीनगर चौकाच्या अगोदरच तो ई-रिक्षातून (e-rickshaw) उतरला आणि त्याने 20 रुपयांऐवजी 10 रुपये भाडे दिले. भांडण झाल्याने तो राजूसोबत घटनास्थळी गेला आणि तिथे त्याच्यावर हल्ला झाला. नशा उतरल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सतीशने आईला शिवीगाळ केल्याने खून केल्याची कबुली दिली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime : नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख चढताच, तरुणावर चाकूने वार करत 20 लाख रुपये लुटले

Nagpur Crime : प्रेयसी इन्स्टाग्रामवर दुसऱ्या युवकाशी बोलायची! तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Vijay Wadettiwar: भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget