नागपूर: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रान भाज्यांची ओळख व्हावी व त्यांच्याऔषधी गुणांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने ग्रामायण व महिला महाविद्यालय यांचा संयुक्त विद्यामाने रान भाज्यांची ( forest vegetables) ओळख या उपक्रमाचे करण्यात आले. ग्रामायण (Gramayan) संस्थेच्या डॉ. शारदा वैद्य यांनी रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे औषधी गुण या विद्यार्थिनींना अतिशय रंजकपणे सांगितले. त्यांनी करटोली, दिंडा, तरोटा, अंबुशी, कपाळ फोडी, खापरखुटी, आघाडा, अंबाडी, भुई आवळा अशा अनेक भाज्या (Wild Vegetable) प्रत्यक्ष दाखवून त्यांचा परिचय करून दिला. सोबतच त्या करण्यास किती सोप्या व आरोग्यासाठी (Health Benifits) याचे फायदे अधोरेखित केले.
या रानभाज्यांच्या सोबतच त्यांनी मिलेट्स सुद्धा आणले होते. ते मिलेट्स दाखवून त्याचा परिचय व आपल्या आहारातील त्याचे महत्त्व नीट समजावून सांगितले विशेष म्हणजे पुढील वर्ष मिलेट्स इयर (INTERNATIONAL YEAR OF MILLETS) म्हणून साजरे केले जावे. या भारताच्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दिला व संयुक्त राष्ट्र महासभेने 2023 ला मिलेट्स इयर म्हणून साजरे करण्यास मान्यता दिलेली असल्याची माहिती दिली.
यानंतर राजेंद्र काळे यांनी औषधी वनस्पती कोणत्या? त्या कशा ओळखाव्या व त्यातील औषधी गुण कोणते? हे पीपीटी दाखवून विद्यार्थिनींना समजावून सांगितले. औषधी वनस्पतींमध्ये त्यांनी पानओवा, गुळवेल, उंबर, ब्राह्मी, शेवगा, धोपा, मटारू वगैरे वनस्पती प्रत्यक्षात दाखविल्या.
...तर औषधींचीही गरज पडणार नाही
या औषधी वनस्पतींचाच औषधांमध्ये वापर केलेला असतो. या आपण आहारात समाविष्ट केल्या तर औषधे घेण्याची गरज पडणार नाही असेही नमूद केले. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भागडीकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयात शिकलेल्या या गोष्टी नेहमीसाठी लक्षात राहतात, त्यांचा भविष्यात आपले व कुटुंबाचे आरोग्य सांभाळण्यासाठी जरूर वापर करण्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या प्रास्तविक अनुराधा सांबरे यांनी केले. त्यांनी ग्रामायण प्रतिष्ठान ची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख चव्हाण यांनी केले.