नागपूरः  तालुक्यातील माथनी-मौदा (Mauda) नदीवरील पुलावर भीषण अपघात झाला आहे.  यामध्ये एका महिलेचा मृत्यू (Women died) झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भारती राजू तिजारे (वय 35, रा. चिरव्हा ता.मौदा) असे मृत महिलेचे नाव आहे. राजू तिजारे (वय 40), सिद्धेश्वरी तिजारे (वय 8) आणि कृष्णराज तिजारे ( वय 12) अशी जखमींची नावे असून सर्व चिरव्हा येथील रहिवासी आहेत. त्यांना नागपूर (Nagpur) येथील खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता अपघाताची तीव्रता दिसून येते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला, पती, आणि दोन मुलांसह दुचाकीने (Two Wheeler) नागपूर कडून येत होते. मौदा येथील माथनी (Mathni Bridge) पुलावर येताच मागुन येणाऱ्या स्विफ्ट डिझायरने (Swift Dzire car) (एमएच 35 AG 9160) त्यांना धडक दिली.  कारने जोरदार धडक दिल्याने महिला उसळून पुलाखाली थडीवर पडली आणि जागीच मृत्यू झाला. तर पती व दोन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट डिझायरमध्ये चार ते पाच जण होते. घटनेनंतर सर्वजण वाहन सोडून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृत महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढे नागपूर येथे पाठविण्यात आले.  याप्रकरणी मौदा पोलिसांनी हिट अँड रन (Hit and Run) चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Session: शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य; व्यंगचित्राच्या बॅनरसह विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी


'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', मनसेचं नवं घोषवाक्य; मराठी अस्मितेला आता हिंदुत्वाची जोड


रुग्णाच्या नातेवाईकांसोबत असभ्य वर्तणूक, डॉक्टर, नर्सविरोधात अधीक्षकांकडे तक्रार


नागपूरः रुग्णाची प्रकृती ढासळली आहे हो, तिच्याकडे लक्ष द्या, अशी विनवणी करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांसोबत डॉक्टर व नर्सने असभ्य वर्तण केल्याचा प्रकार मेडिकलमध्ये घडला. या घटनेनंतर नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे संबंधित डॉक्टर व नर्सविरोधात रितसर तक्रार नोंदविली.


मुलताईच्या आंबेडकर वॉर्डमध्ये राहणारे सतीश निरापुरे यांच्या साळीला मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 27 मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दुपारी त्यांची प्रकृती खालावली. तिला होणारा त्रास बघवत नसल्याने सतीश यांनी वॉर्डातील नर्सला माहिती दिली. यावर नर्सकडून उद्धटपणे उत्तर दिले गेले. प्रकृतीबाबत डॉक्टरांच्या राउंडच्यावेळीच का सांगितले नाही, अशी उलट विचारणाही तिने केली. नर्सकडून सहकार्य मिळत नसल्याने वॉर्डात हजर डॉक्टरांकडे विनवणी केली. त्यावर डॉक्टरने संबंधित महिला माझी रुग्ण नसल्ये मी उपचार करू शकत नसल्याचे सांगितले. उपचाराचा आग्रह धरला असता डॉक्टर महाशयांनी धक्का दिला. त्यानंतर डॉक्टर आणि नर्सने संयुक्तरित्या सतीश आणि त्यांच्या पत्नी ममता यांचा सर्वांदेखत पानउतारा करणे सुरू केले. याप्रकाराने व्यथित सतीश यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात जाऊन रितसर तक्रार दिली. संबंधित नर्स, डॉक्टरवर कारवाई करावी, सोबतच रुग्ण महिलेवर योग्य उपचार करण्याची विनंती तक्रारीतून करण्यात आली आहे.