एक्स्प्लोर

वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, अबू आझमींचा राज ठाकरेंना सल्ला

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. यावरुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.

नागपूर : वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, राज ठाकरे तुम्ही बाळासाहेबांच्या कुटुंबातील सदस्य आहात, किमान त्यांच्याकडे पाहून तरी असे वागू नका, असा सल्ला समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिला आहे. शिवसेनेची वाटचाल आणि त्यांचा मुख्यमंत्री झालेला पाहून राज ठाकरे भाजप जवळ जात आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी भाजपसमोर गुडघे टेकवू नये, असंही अबू आझमी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अबू आझमी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. यावरुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी टीका केली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी मिमिक्री करुन ज्या भाजपवर हल्लाबोल केला. राजकारणासाठी त्याच भाजपसोबत जाणे योग्य नसल्याचे मत अबू आझमी यांनी मांडले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या एका भूमिकेवर कायम राहावे, वारंवार धरसोड करु नये असा सल्लाही आझमी यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहावे - मुंबईत सर्वांनी मिळून उद्धव ठाकरे यांना मजबूत केले पाहिजे. भाजपला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे, असेही अबू आझमी म्हणाले. मुंबईत राहूनही एवढ्या वर्षात कधीच उद्धव ठाकरे यांना भेटलो नव्हतो. मात्र, आता त्यांना भेटल्यावर ते उत्कृष्ट व्यक्ती असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांना साथ देत असल्याचे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडली हे महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब असल्याचे मतही अबू आझमी यांनी व्यक्त केले. भविष्यात मुंबईतील निवडणुकीत शिवसेनेसोबत जाण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, ते त्यावेळी ठरवू, असे सांगत दारे खुली ठेवली आहेत. आम्ही एकही कागद देणार नाही - मतं घेताना नरेंद्र मोदी यांनी कोणताही पुरावा मागितला नाही. मात्र, आता लोकांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे मागितली जात आहेत. मोदींनी कितीही पुरावे मागितले तरी आम्ही एकही कागद देणार नाही, असा इशारा ही अबू आझमी यांनी दिला आहे. एकप्रकारे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. संबंधित बातमी - मनसेने कार्यपद्धती बदलल्याशिवाय युती नाही, देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना रेड सिग्नल BJP-MNS Alliance | मनसेने कार्यपद्धती बदलली तर युती शक्य - देवेंद्र फडणवीस | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought: राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
Parinay Fuke : नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त
नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget