• आतापर्यंत आढळलेले रुग्ण 455




  • नागपूर शहरातील आढळलेले रुग्ण 241




  • नागपूर शहरात आढळलेल्या रग्णांची टक्केवारी 52.96




  • नागपूर ग्रामीणमध्ये आढळलेले एकूण रुग्ण 83




  • नागपूर ग्रामीणमध्ये आढळलेल्या रग्णांची टक्केवारी 18.24




  • नागपूर जिल्ह्याबाहेरील आढळलेले रुग्ण 131




  • नागपूर जिल्ह्याबाहेरील आढळलेल्या रुग्णांची टक्केवारी 28.81




नागपूरः शहराज दरवर्षी हिवताप, डेंगी (Dengue), गॅस्ट्रो (Gastro) हे संसर्ग आजार डोके वर काढतात. मागील दोन वर्षे कोरोनाची (Covid 19) महामारी अनुभवली. कोरोना अटोक्यात येण्याची चिन्हे असली तरी स्वाईन फ्लू (Swine Flu) ऐन सणाच्या हंगामात हातपाय पसरत आहे. जिल्ह्यात जुलैपासून हे संकट चांगलेच घोंघावत आहे. प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 8 नवीन रुग्ण आढळले. आजपर्यंत 455 बाधित आढळून आले आहे. यातील 241 बाधित म्हणजेच तब्बल 53 टक्के रुग्ण शहरातील आहेत.


स्वाईन फ्लूचा विळखा शहराभोवती (Nagpur) घट्ट होत आहे. मात्र महानगरपालिका (NMC) केवळ जनजागरण एजन्सीप्रमाणेच काम करीत आहे. केवळ आकडेवारी ठेवण्यापर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी (NMC Health Department) काम करीत आहेत. मेडिकल, मेयो, एम्समध्ये रुग्णांवर उपचार होत आहेत. आतापर्यंत 25 स्वाईन फ्लूबाधितांच्या मृत्यूवर समितीने शिक्कामोर्तब केले आहे. यात शहरातील 10 रुग्ण स्वाइन फ्लूने दगावले. तर ग्रामीणमधील 4 आणि जिल्ह्याबाहेरील 11 असे एकूण 25 जण दगावले.


प्राप्त अहवालानुसार शहरात 3, ग्रामीणमध्ये 3 आणि जिल्ह्याबाहेरील (इतर जिल्हे व परराज्य) 2 असे एकूण 8 स्वाईन फ्लू बाधित आढळले. आतापर्यंत आढळलेल्या 455 रुग्णांपैकी 262 रुग्णांनी स्वाइन फ्लूवर मात केली.


वाचाः Nagpur School Principal Kidnapped : मैत्रिणीनेच केले होते मुख्याध्यापकाचे अपहरण, 30 लाखांसाठी तब्बल 16 तास ठेवले ओलीस


Booster Dose : गणेश मंडळात 3124 लोकांना बूस्टर डोस


नागपूरः शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये (Ganesh Utsav Mandal) कोविड प्रतिबंधात्मक बूस्टर डोसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या संकल्पनेला गणेश मंडळ आणि नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरातील 118 गणेश मंडळांमध्ये आतापर्यंत 3124 जणांनी बूस्टर डोस (Booster Dose) घेतला आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करीत असताना पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा जपणे आवश्यक आहे, तसेच लसीकरणही (Vaccination) तितकेच महत्त्वाचे आहे. याचा विचार करता मनपातर्फे राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसात तब्बल 3 हजाराहून अधिक लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.


वाचाः Nagpur News : नव्या 42 चेक पोस्टद्वारे अवैध रेती वाहतुकीवर 'वॉच', महसूल बुडविणाऱ्यांवर कठोर कारवाई