एक्स्प्लोर

Nagpur Police : जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात नागपूर पोलिस 'अॅक्शन मोड'वर

Nagpur : आता चौकांसह कुठल्याही समारंभात तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे मागितल्यास त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहे.

Nagpur Police News : नागपूर शहरातील विविध सिग्नलवर तसेच घरात कुठलेही शुभप्रसंग असल्यास घरात जबरदस्ती शिरुन पैशाची मागणी करणाऱ्या तसेच पैसे दिले नाही तर धिंगाणा घालणाऱ्या तृतीयपंथींयांविरोधात नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. नागपूर पोलिस (Nagpur Police) आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून 17 फेब्रुवारीपर्यंत शहरात पैशांची मागणी करणारे तसेच पैसे देण्यासाठी नकार देणाऱ्यांकडे धिंगाणा घालणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात कलम 144 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात कुठेही लग्न,बारसे वा इतर कार्यक्रम असल्यास तिथे तृतीयपंथींयांच्या टोळ्या घरात शिरुन पैशाची मागणी करतात. अशावेळी त्यांना नकार दिल्यास त्यांच्याकडून अश्‍लिल शिविगाळ आणि धमक्या देण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्याबाबत अनेकदा तक्रारीही आल्यात. त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आता चौकांसह कुठल्याही समारंभात जबरदस्तीने पैसे मागितल्यास त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहे.  

नाईलाजाने अनेकजण देतात पैसे

शहरातील निवासस्थान, व्यवसायिक प्रतिष्ठान व वाहतूक सिग्नलवर येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वार असो वा कुठलाही लग्नसोहळा, बारसे, उत्सव, स्नेहसम्मेलन, धार्मिक कार्यकम किंवा मृत्यू प्रसंगी तृतीयपंथियांची टोळी घरात शिरते. या टोळींकडून घरातील व्यक्तींना पैशाची मागणी केली जाते. अनेकदा अवास्तव पैसे मागून घरच्यांना त्रासही देण्यात येतो. अनेकदा त्यांना नकार देताच तृतीयपंथियांच्या टोळीकडून अश्‍लिल शिवीगाळ आणि दहशत पसरविण्याचे काम केल्या जाते. तसेच अश्‍लिल वर्तनही करण्यात येते. त्यामुळे नाईलाजाने अनेकजण पैसे देत, त्यांच्याकडून पिच्छा सोडविताना दिसून येतात. 
 
शहरातील विविध चौकात वसूली

विशेष म्हणजे, अनेकदा जबरीने तृतीतपंथियांकडून पैशासाठी तगादा लावण्यात येत असल्याचे दिसते. चौकात अगदी नागरिकांच्या जवळ जाऊन त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्याबाबत सातत्याने पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एकंदरीत तृतीयपंथियांची शहरात दहशत निर्माण झाली असून त्यांच्याकडून सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने पोलिस आयुक्तांनी आदेश काढून अशा तृतीतपंथियांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. हे आदेश 17 फेब्रुवारीपर्यंत अस्तित्वात राहणार आहेत. 

असे आहेत नागपूर पोलिस आयुक्तांचे आदेश...

  • नागपूर शहरात तृतीयपंथियांविरोधात आजपासून कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
  • या अंतर्गत टोळी वा एकटे तृतीयपंथी कुठल्याही कार्यक्रमात पैशाची मागणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • ट्रॅफिक जंक्शन,चौकात एकत्र येण्यास आणि वाहनचालक, प्रवाशांकडून पैसे मागण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • आयोजकाने आमंत्रित केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
  • आदेशाचे उल्लंघन केल्यास नागपूर पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ही बातमी देखील वाचा...

नायलॉन मांजामुळे जीव गमावलेल्यांबद्दल राज्य सरकारचं धोरण काय ? हायकोर्टाची विचारणा...

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Congress Morcha: E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget