एक्स्प्लोर

Nagpur : ट्रान्सपोर्टरच्या गोदामात धाड ; बनावट डिझेलसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur Police : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे बनावट डिझेलचा साठा करणारे, तसेच खुली विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Nagpur Crime News : अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि कामठी (जुने) पोलिसांच्या (Nagpur Police) संयुक्त पथकाने खैरी (ता. कामठी) शिवारातील फ्रेंड्स ट्रान्सपोर्टच्या गोदामात धाड टाकली. यात बनावट डिझेलसह 22 लाख 82 हजार 900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही, हे विशेष.

खैरी शिवारात असलेल्या फ्रेंड्स ट्रान्सपोर्टच्या गोदामात बनावट डिझेल तयार करून ते बाजारात विकले जात असल्याची माहिती कामठी (जुने) पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिली आणि नंतर संयुक्तरीत्या धाड टाकली.

यात 28 हजार 200 रुपयांचे तीन हजार लिटर बनावट डिझेल, मोटरपंप, मोजमाप साहित्य असा एकूण 22 लाख 82 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोदाम सील करण्यात आले, अशी माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी पंकज पंचभाई व ठाणेदार दीपक भिताडे यांनी संयुक्तरीत्या दिली. याप्रकरणी कामठी (जुने) पोलिसांनी भादंवि 285, अत्यावश्यक वस्तू, कायदा 1955 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

आरोपीवर अहवालानंतर कारवाई

  • गुन्हा कुणाविरुद्ध दाखल करण्यात आला, ते गोदाम कुणाच्या मालकीचे आहे, यात किती जणांचा सहभाग आहे. हे देखील पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही.
  • या डिझेलचे नमुने नागपूर शहरातील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 
  • वृत्त लिहीपर्यंतही या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही किंवा ताब्यात घेण्यात आले नाही.
  • त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्त्तीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ

प्राप्त माहितीनुसार ट्रान्सपोर्टच्या या गोदामात अनेक महिन्यांपासून बनावट डिझेलची निर्मिती करण्यात येत होती. तसेच सुरुवातीला काही खास ग्राहकांनाच डिझेल देण्यात येत होते. मात्र नंतर खुल्या बाजारतही मागणी येईल त्याप्रमाणे याची विक्री जारोत सुरु होती. याबाबत परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र तरी कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून 'अर्थकारण' असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र अचानक पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे बनावट डिझेलचा साठा करणारे, तसेच खुली विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

ही बातमी देखील वाचा...

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाला नागपुरात अटक; आई जाब विचारण्यासाठी गेली तर...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought: राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
Parinay Fuke : नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त
नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget