नागपूर: पशुधनावरील 'लम्पी' चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्यस्त्रोताव्दारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही गतीने करावी, असे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी दिले.
लसींचा मुबकल साठा उपलब्ध
राज्य शासनाने (State Government) प्रत्येक जिल्ह्याला मुबलक लसी (Vaccine) उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनावरांवर लक्षणे दिसताच औषधोपचार (Medication) केल्यास जीवितहानी होणार नाही. त्यामुळे गोपालक व शेतकऱ्याने (Farmers) पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत लम्पी चर्मरोग (skin diseases) प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पशुधनांचे लसीकरण
पशुधनावरील लम्पी त्वचारोगाचा (lumpy skin disease in cattle) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्सगित क्षेत्रातील पशुधनांचे लसीकरण, गुरांची खरेदी-विक्री बंदी, जनावरांच्या गोठ्यात किटकनाशकांची फवारणी, पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. पशुधनांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 10 हजार (every talika 10 thousand vaccine) याप्रमाणे लसींचा पुरवठा होणार आहे. ज्या गावातील जनावरांना लम्पी सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत, तेथील नमुने तपासणीसाठी (lampi sample testing in pune) पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवावेत. पशुसंवर्धन विभागाने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा व लक्षणे दिसणाऱ्या गुरांवर तत्काळ उपचार करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलींद कुमार साळवे, आशा पठाण, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?
- लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
- जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
- निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
- गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.
- लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
- बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
- बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
- मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या