Raj Thackeray Vidarbha Tour :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) आजपासून पाच दिवस विदर्भाच्या (Vidarbha Tour)दौऱ्यावर आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या मिशन विदर्भमध्ये राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसनं निघालेले राज ठाकरे आज साडेआठ वाजेच्या सुमारास नागपुरात पोहोचले. त्यांचं नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 


राज ठाकरे आज नागपुरात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. याशिवाय या दौऱ्यात ते विविध मान्यवरांच्या गाठीभेटीही घेतील.


मनसेकडून पोस्टर आणि बॅनर्स लावून स्वागत


राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वी नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि रेल्वे स्थानकापासून राज ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलपर्यंत मनसेकडून मोठ्या प्रमाणावर पोस्टर आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. हिंदू जननायक राज ठाकरे यांचे संत्रा नगरीत स्वागत अशा आशयाने राज ठाकरे यांना हिंदू जननायक संबोधन ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. नागपुरात आज राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. ते रविभवनात आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 


राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळं विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात तसेच संघटना वाढीसाठी या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.


राज ठाकरेंचं मिशन विदर्भ 
राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी आजपासून 5 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. 
आज सकाळी 11 वाजता रवी भवन सर्किट हाऊसवर राज ठाकरे नागपूर शहर आणि ग्रामीण मधील कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठका करतील.  
19  सप्टेंबर- गाठीभेटी आणि राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते चंद्रपूरला रवाना होतील. 
चंद्रपुरात त्यांचं जंगी स्वागत होईल आणि विभागवार बैठका होतील. 
 20, 21  सप्टेंबर- अमरावतीत विभागवार बैठका होतील. 
22 सप्टेंबर- तारखेला राज ठाकरे मुंबईत परततील. 


इतर महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray: रझाकार आणि 'सजा'कार दोघांचा बंदोबस्त मनसे करेल; खरमरीत पत्र लिहित राज ठाकरेंचा इशारा


Raj Thackeray BMC Elections : मनसेचं 'एकला चलो रे'; मुंबईसह सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार