एक्स्प्लोर

क्रौर्याची परिसीमा गाठणारं कृत्य, सूतगिरणीत काम करणाऱ्या महिला कामगारावर पर्यवेक्षकाकडून बलात्कार

गेल्या काही दिवसात नागपुरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. नुकतंच कामठी परिसरात एका 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्याचा तपास पूर्ण झालेला नसताना पारडीमध्ये पाशवी बलात्काराची ही घटना समोर आली आहे.

नागपूर : नागपुरात क्रौर्याची परिसीमा गाठणारी एक घटना उघडकीस आली आहे. भंडारा रोडवरील एका औद्योगिक वसाहतीतील सूतगिरणीमध्ये काम करणाऱ्या एका 19 वर्षीय महिला कामगारावर तिथल्याच पर्यवेक्षकाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला हेतू साध्य करण्यासाठी या नराधमाने पीडितेला एकटे पाहून आधी तिच्यावर गुंगीच्या स्प्रेचा वापर करून तिला बेशुद्ध केले आणि बलात्कारानंतर तिच्या गुप्तांगात धातूची वस्तू टाकून तिला जखमी केले. पोलिसांनी या प्रकरणी योगीराज रहांगडाले या आरोपी पर्यवेक्षकाला अटक केली आहे. नागपूरच्या एका औद्योगिकी वसाहतीत असलेल्या सूत गिरणीतील 19 वर्षीय महिला कामगारासोबत बलात्काराची घटना घडली आहे. सूत गिरणीला लागूनच असलेल्या कामगारांच्या इमारतीत 21 जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार 21 जानेवारीच्या रात्री तिच्यासोबत खोलीत राहणारी तिची मैत्रीण आणि भाऊ बाहेरगावी गेलेले होते. त्याचाच फायदा घेत सूतगिरणीत पर्यवेक्षक असलेल्या योगीराज रहांगडालेने तिच्या खोलीत प्रवेश केला. काही समजण्याच्या आधीच त्याने गुंगीचा स्प्रे तोंडावर मारल्याने तीव्र वास येऊन पीडिता बेशुद्ध झाली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर स्वतःच्या शरीराची अवस्था, होणाऱ्या असह्य वेदना आणि शरीरातून होणाऱ्या रक्तस्रावामुळे तिला सोबत घडलेल्या प्रकाराची जाणीव झाली. वेदनेमुळे तिने किंचाळताच शेजारी राहणाऱ्या कामगारांनी तिकडे धाव घेतली आणि पीडितेची अवस्था पाहून तिला रुग्णालयात नेले. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर पीडितेने काल पारडी पोलीस स्टेशन गाठून घटनेची रीतसर तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करून आरोपी पर्यवेक्षक योगीराज रहांगडाले विरोधात गुंगीचे स्प्रे वापरून बेशुद्ध करणे आणि बलात्कार करणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पर्यवेक्षक योगीराज रहांगडालेला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. एबीपी माझाने या प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेला दुजोरा दिला. मात्र, कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, शहरात दर दोन दिवसांनी हत्येच्या घटना सुरूच असून गेल्या चारपाच दिवसात नागपुरात रोजच महिलांच्या सोनसाखळ्या पळवण्याची प्रकरणंही समोर येत आहे. त्यामुळे क्राईम कॅपिटल नागपुरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी हैदोस मांडल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Beed : 'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
Ishwarpur : जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल
जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget