Nagpur Fire Accident: नागपूर शहरात अग्नीतांडव! रात्रभरात फटाक्यांनी सहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना, स्मार्ट स्टोर आगीत भस्मसात
Nagpur Fire Accident : नागपूर शहरामध्ये गेल्या रात्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्यांनी सहा ठिकाणी आग (Fire Accident) लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

Nagpur Fire Accident : नागपूर शहरामध्ये गेल्या रात्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्यांनी सहा ठिकाणी आग (Fire Accident) लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील मोठी आग (Fire) हि आठ रस्ता चौक येथील रिलायन्स स्मार्ट स्टोरलाला लागली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीत स्मार्ट स्टोरमधील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशाम दलाला आग विझवण्यात यश आले आहे. मात्र या आगीत लाखो रुपयाच्या मालमत्तेचे मोठं नुकसान झाले आहे.
या व्यतिरक्त छोट्या छोट्या आगीच्या पाच घटना शहराच्या वेगवेगळ्या भागातून पुढे आल्या. ज्यात कचऱ्याला आग लागणे, झाडाला आग लागणे अशा घटना घटनांची अग्निशमन दलाकडे नोंद झालीय.
Baramati Fire: बारामतीतील भंगार गोदामाला भीषण आग
दुसरीकडे, बारामतीतील फलटण रोड परिसरात असलेल्या एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट सर्वत्र पसरलेले पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या अनेक तासांपासून ही आग धुमसत होती, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीच्या धुरामुळे जवळच्या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, गोदामातील मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Nalasopara Fire: नालासोपारा पूर्वेकडील गोदामांना भीषण आग, चार गोदामं जळून खाक
नालासोपारा (Nalasopara) पूर्वेकडे साई बाजार (Sai Bazar) इमारतीमागे असलेल्या गोदामाला (Godown) भीषण आग लागल्याची घटना घडली. वसई-विरार (Vasai-Virar) अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या अग्नितांडवात चार गोदामं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीची माहिती मिळताच वसई-विरार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सध्या आगीचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.
ही बातमीही वाचा:
ऐन दिवाळीत कामोठ्यात आक्रित घडलं, सिलेंडर्सच्या भीषण स्फोटाने आग लागली, माय-लेकीचा होरपळून मृत्यू



















