एक्स्प्लोर
Advertisement
जनसंघर्ष यात्रेत स्टंटबाजी, काँग्रेस कार्यकर्ता जखमी
काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी भिवंडी येथे समापन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण भिवंडीत दाखल झाल्यानंतर भिवंडी शहरात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी काँग्रेसने मोठी बाईक रॅली काढली होती.
मुंबई : काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी भिवंडी येथे समापन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण भिवंडीत दाखल झाल्यानंतर भिवंडी शहरात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी काँग्रेसने मोठी बाईक रॅली काढली होती. परंतु या रॅलीदरम्यान एक युवक स्टंटबाजी करत होता. स्टंटबाजी करत असताना त्याचा अपघात होऊन तो जखमी झाला आहे.
दरम्यान जनसंघर्ष यात्रेच्या समापनासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरु असताना सोसाट्याचा वारा वाहत होता. सभेत अशोक चव्हाण यांचे भाषणही झाले. भाषण संपल्यानंतर अधिक जोरदार वारा वाहू लागल्याने टेबलावर ठेवलेली एलईडी कोसळली. एक युवक त्याखाली दबला जाऊन जखमी झाला.
गेल्या साडेचार वर्षात राज्यातल्या भाजप-शिवसेना सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई आणि बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. परंतु सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा काढली असल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात येत आहे.
जनसंघर्ष यात्रेच्या समापनाच्या कार्यक्रमावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, "जनसंघर्ष यात्रा संपली आहे. परंतु संघर्ष सुरुच राहणार आहे." तसेच प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चव्हाण म्हणाले की, "प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशामुळे आपल्याला दुसऱ्या इंदिरा गांधी मिळाल्या आहेत. पारतंत्र्यात असताना आपल्याला 'गोरोंसे लढो' असे म्हणावे लागत होते. आता आपल्याला चोरांशी लढावे लागत आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement