एक्स्प्लोर
कल्याणमधून आयसिसमध्ये भरती तरुणाचा सीरियात मृत्यू?
सीरियातील रक्का शहराजवळ लढताना फहादचा मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं.
कल्याण : आयसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या फहाद शेख या तरुणाचा सीरियामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रमांकाने आलेल्या फोनवरुन फहादच्या कुटुंबाला मृत्यूची वार्ता देण्यात आली.
सीरियातील रक्का शहराजवळ लढताना फहादचा मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं. त्यानंतर फहादच्या परिवाराने एनआयएला ही माहिती दिली.
आयसिसने जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये फहाद तन्वीर शेख दिसलाही होता.
फहादचा मृत्यू झाला की नाही याची पडताळणी करणं सद्यस्थितीत कठीण आहे. रक्का येथे गेल्या आठवड्यात आयसिसचा पराभव झाला. या भागातील हिंसक परिस्थिती पाहता शेखच्या मृत्यूची पडताळणी करणे कठीण असल्याचं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं.
कल्याणमध्ये राहणारे अमन तांडेल, सहिम तानकी, आरिफ मजिद आणि फहाद शेख हे चार तरुण 2014 साली आयसिसमध्ये भरती झाले होते. हे चौघेही तरुण उच्चशिक्षित होते. बगदादमार्गे ते आयसिसमध्ये भरती झाले होते.
त्यानंतर अशाच प्रकारे फोनद्वारे सहिम तानकी आणि अमन तांडेल यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं होतं. तर आरिफ मजीद हा तरुण नोव्हेंबर 2014 मध्येच भारतात परतला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement