मुंबई : इस्लामपूर येथील रेठरे हरणाक्ष गावच्या हसन हकीम या तरुणाला बोलता येत नाही. मागील वर्षी आलेल्या पुरात त्याचं संपूर्ण घरदार उद्ध्वस्त झालं. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपल्या समस्येचे हमखास निवारण होईल या अपेक्षेने हा पाटील यांना भेटण्यासाठी आला. मात्र, त्याला आपल्या समस्या मंत्र्यांकडे मांडाताच येईना. मग तरुणाने शक्कल लढवत जयंत पाटील यांच्या समोरच पत्नीला व्हिडीओ कॉल लावला. जयंत पाटील यांनीही आपल्या हजरजबाबी वृत्तीने समस्या जाणून घेतली आणि समस्येची सोडवणूक करण्यासाठी तत्काळ आदेश दिले.

मागील वर्षी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातलं होतं. या महापुरात अनेक संसार उद्ध्वस्त झाले तर अनेक रस्त्यावर आले. तर, पुरात अनेक घरांची पडझड झाली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यापैकीच एक हकीम कुटुंबीय. या कुटुंबाला राज्य सरकारची 95 हजारची मदत तर झाली. मात्र, केंद्राकडून येणारी मदत अद्यापही प्रलंबित आहे. मदत अपुरी असल्याने हसन हकीम आणि त्यांच्या पत्नीने यांनी थेट जयंत पाटील यांच्याकडे दाद मागितली. जयंत पाटील यांनी या कुटुंबाचा प्रश्न समजून घेत आपल्या जवळ असलेल्या प्राशसकीय अधिकाऱ्यांना तात्काळ समस्येची सोडवणूक करण्यासाठी आदेश दिले.

औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मराठा क्रांती मोर्चाचा गोंधळ, जयंत पाटलांसमोर घोषणाबाजी

पूरग्रस्तांसाठी 15 हजार तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत
सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या पुरातील पीडितांच्या कुटुंबीयांना तत्कालीन महाराष्ट्राने पूरग्रस्तांसाठी 15 हजार, तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली होती. यात घरात पाणी शिरलेल्या पूरग्रस्तांसाठी 10 तसेच 15 हजार हजार रुपये, पुरामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी 5 लाख रुपये तसेच पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, ही मदत तुटपुंजी असून अजूनही काही संसार उभे राहिले नसल्यांचं पूरग्रस्तांचं म्हणणं आहे. दरम्यान, राज्यात आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. जवळपास 50 च्यावरती लोकांना या महाप्रलयात आपला जीव गमवावा लागला. तर, हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं होतं. पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल मिळाला आहे.

Aurangabad Maratha Protest in NCP Meeting | औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मराठा क्रांती मोर्चाचा गोंधळ