मुंबईत आधीच झाडे कमी, त्यात अनेक प्रकल्पानिमित्त हजारो झाडे तोडण्यात येत आहेत. शिवाय होळीकरिता मुंबईत ठिकठिकाणी झाडे तोडून होलिकादेवी म्हणून तोडलेल्या झाडांची पुजा केली जाते आणि तीच झाडे जाळली जातात. मात्र, यंदा होळिला झाडे तोडल्यास धुलिवंदन जेलमध्ये साजरे करावे लागू शकते. कारण झाडे तोडून होळी साजरी केल्यास पर्यावरण कायद्याअंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते. प्रसंगी पोलिस तुम्हाला अटकही करू शकतात.
Coronavirus | कोरोनापासून दूर राहण्यासाठी सचिनचा 20 सेकंदाचा व्हिडीओ पाहा
एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर गुलाल उधळल्यास, फुगे मारल्यास किंवा पाण्याने भरलेल्या पिशव्या मारल्यासही कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. होळी आणि धुलिवंदना निमित्त मुंबईभर 40 हजारपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून महिलांची छेडछाड रोखण्याकरता साध्या वेशातील विशेष महिला छेडछाड पथक देखील मुंबईत पुढील दोन दिवस गस्त घालणारेत.
Corona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डरवरील रिट्रीट सोहळा रद्द, आयफा सोहळाही पुढे ढकलला
पोलीसांची होळीसाठी विशेष तयारी
- कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त, विभागीय पोलिस अधिकारी व अंमलदार, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलिस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी. एस., असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय
- मुंबईतील महत्वाची ठिकाणे, चौपाट्या, धार्मिक स्थळे, राजकीय नेत्यांचे पुतळे, मॉल्स, आणि गर्दीची ठिकाणे येथे सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.
तर, तळीरामांना पकडण्यासाठी मुंबई वाहतुक विभागातर्फे सुमारे 1450 पेक्षा जास्त पोलिस ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहेत. - धुलिवंदन हे सण आनंदाचे रंग उधळारे सण आहेत. मात्र, कायदा मोडल्यास रंगाचा बेरंग होवू शकतो. शिवाय सध्या जगभरात चालू असलेल्या कोरोना या आजाराच्या अनुषंगाने नागरीकांनी स्वत:ची काळजी घेवुन उत्सव साजरा करावा, असं मुंबई पोलीसांतर्फे आवाहन करण्यात आलंय.
Corona Virus Holi Decoration | बीडीडी चाळीतला होलिकोत्सव, उभारली कोरोना वायरसची राक्षसरुपी प्रतिकृती