औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा हा मेळावा होता, आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ केला. यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, शिवस्मारक पूर्ण करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा तरुणांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप या आंदोलनावर तोडगा निघाला नाही. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची एक बैठक पार पडली. पण है बैठकही निष्फळ ठरली. मराठा आरक्षण प्रश्नावर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एका उपसमितीची स्थापना करण्यात आलीय. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मराठी ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याचे बोलले जात आहे.

सारथी संस्थेतील भ्रष्टाचाराची आता दुसऱ्या समितीकडून पुन्हा चौकशी

जयंत पाटील यांची सारवा सारव
मराठा मोर्चा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला नाही. तर ते मला भेटायला आले होते, अशी सारवासारव जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. मेळाव्यात कुठलाही गोंधळ झाला नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. आमची आंदोलकांसोबत चर्चा सुरुय आणि त्यावर तोडगा ही निघेल असं जयंत पाटील म्हणाले. तर औरंगाबाद महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु, खासदार संभाजीराजेंचा इशारा

प्रवीण दरेकरांनी घेतली आंदोलकांची भेट
मुंबईतील आझाद मैदानात मागील 40 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या आंदोलकांची मागणी अजूनही मान्य झाली नाही. आज पुन्हा एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी बोलताना दरेकर यांनी मराठा आंदोलकांच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशारा देखील दिला. यावेळी आमदार राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. आंदोलकांची मराठा आरक्षण अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 18 नुसार पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळावी, आशी मागणी आहे. दरम्यान काल शनिवारी या सर्व आंदोलकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावलं होतं. परंतु तब्बल अडीच तास थांबून देखील त्यांना भेट देण्यात आली नाही. याबाबत आंदोलकांनी आम्हाला भेट द्यायचीच नव्हती तर विधान भवनाच्या बाहेर पोलीस गाडीत केवळ बसवून का ठेवलत असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

Maratha Morcha | राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मराठा मोर्चा कार्यकर्त्यांचा गोंधळ