एक्स्प्लोर

मास्क का घातले नाही? यावर राज ठाकरे यांचं उत्तर..

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र विनामास्क मंत्रालयात पोहोचले. यावर विचारले असता राज यांनी मिश्किल उत्तर दिले.

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्रालयात दाखल झाले. परंतु, यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले. यावर त्यांना विचारले असता त्यांनी मिश्किल उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. मास्क का नाही घातला यावर ते हसले आणि इतरांनी घातला म्हणून मी नाही घातला, असं म्हणत पुढे निघुग गेले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. मंत्रालयात आलेल्या बहुतांश नेत्यांनी मास्क वापरलेलं होतं. जेव्हा एखादा नेता सरकारने सांगितलेले नियम पाळावे असं सांगत असतो, त्यावेळी त्याने स्वत: देखील त्याचं पालन करणं गरजेचं असतं. परंतु, राज ठाकरे यांनीच मास्क न वापरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील मास्कमध्ये होते. यावर राज यांना विचारले असता हसले आणि सर्वांनी मास्क घातले म्हणून मी घातला नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

मास्क का घातले नाही? यावर राज ठाकरे यांचं उत्तर..

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न केल्यास हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण राज ठाकरे मास्क न लावताच मंत्रालयात आल्याने, कोरोना व्हायरससारख्या साथीमध्ये नियम आणि अटी सामान्यांसाठी आणि व्हीआयपींसाठी वेगळ्या आहेत का? असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय?, राज ठाकरेंची विचारणा; सरकारला नऊ सूचना

राज यांच्या सरकारला सूचना लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी बैठकीत केलेल्या सूचनांबद्दल माहिती दिली. तसंच शहराच्या एन्ट्री पॉईंटवर नियम कडक करायला हवे. प्रत्येक वेळी माणुसकी उपयोगाची नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Coronavirus | Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क मंत्रालयात दाखल | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना
दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Embed widget