एक्स्प्लोर

मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील

सरकारने आज दुपारी तीन वाजता गटनेत्यांची बैठक बोलावली होती होती. पण आता ही बैठक उद्या सकाळी दहा वाजता होणार असल्याचं कळलं. यावरुन सरकारची भूमिका ठरलेली नाही, म्हणून ते चालढकल करत आहेत

मुंबई : मागासवर्ग आयोगाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केला आहे. "या अहवालावरुन मुख्यमंत्री का घाबरत आहेत," असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे. "सरकारकडे मागास वर्ग आयोग अहवाल मागितला तर तो इंग्लिशमध्ये असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा अहवाल येऊन किती आठवडे झाले, अजून त्याचं भाषांतर झालं नाही. अहवाल तयार असूनही सादर करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे, त्यामुळे अहवालात आक्षेपार्ह असावं, अशी आम्हाला शंका आहे," असं जयंत पाटील म्हणाले. तसंच धनगर आरक्षणाबाबत टिसचा अहवाल येऊन दोन महिने झाले तोही द्यायला सरकार तयार नाही. महाराष्ट्रातील धनगर समाजाला फसवण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसत आहे. मुख्यमंत्री का घाबरत आहेत? या अहवालातील काही गोष्टी समोर आल्या तर काही घटक दुखावले जातील, याचा सरकारला आत्मविश्वास नाही की भीती वाटते. सरकार इतकं भित्र असेल तर यांना कोणतंच काम करता येणार नाही," असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. "सरकारने आज दुपारी तीन वाजता गटनेत्यांची बैठक बोलावली होती होती. पण आता ही बैठक उद्या सकाळी दहा वाजता होणार असल्याचं कळलं. विरोधी पक्षांना विश्वासात न घेऊन सरकारने पावलं टाकायला हवी होती. त्याकडेही मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष, म्हणून मीटिंग पुढे ढकलत आहेत. यावरुन सरकारची भूमिका ठरलेली नाही, म्हणून ते चालढकल करत आहेत," असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Pujya Gurudevshri Rakeshji : मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी
मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Embed widget