एक्स्प्लोर

BMC शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर मिळण्यास विलंब का? नितेश राणे यांच्याकडून चौकशीची मागणी

मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर मिळण्यास विलंब का होत आहे, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. सोबतच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दप्तर मिळण्यास विलंब का होत आहे, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. सोबतच या सर्व विलंबाबाबत त्वरीत चौकशी करुन निविदा प्रक्रिया पाडावी आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संस्थांना निविदेत सामावून घेण्यासाठी धोरण जाहीर करावं, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. मुलांना ही दप्तरे वेळीच मिळणं आवश्यक आहे, परंतु प्रशासनाने केवळ कुणाच्या दबावाखातर काम केल्यामुळे दप्तरे मिळण्यास विलंब होणार आहे, असं नितेश राणे यांनी विचरलं आहे.

महापालिकेच्या शाळा या 13 जूनपासून खुल्या होत आहेत. परंतु अद्यापही शाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शालेय वस्तू पोहोचलेल्या नाहीत. एका बाजूला महापालिकेच्या शाळांमध्ये 35 हजार विद्यार्थी वाढल्याचा डंका पिटला जातो, परंतु दुसरीकडे जी मुले शिकत आहेत आणि जी मुले अशाप्रकारचे साहित्य मिळणार म्हणून प्रवेश घेत आहेत, त्यांना शाळा सुरु झाल्यानंतरही जर हे साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही तर मुलांनी शिकायचे कसे हा प्रश्न आहे, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.

नितेश राणे यांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?
बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये 27 शालेय वस्तूंचे वाटप सन 2007 पासून  करण्यात येत असून दरवर्षी हे साहित्य विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन दिले जाते. मागील काही वर्षांपासून शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना हे साहित्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुरु आहे. मागील दोन वर्षांत कोविडमुळे मुलांना शालेय शिक्षण हे कधी ऑनलाईन तर कधी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून घेता आले. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने महापालिकेच्या शाळा या 13 जूनपासून खुल्या होत आहेत. परंतु अद्यापही शाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शालेय वस्तू पोहोचलेल्या नाहीत. एका बाजूला महापालिकेच्या शाळांमध्ये 35 हजार विद्यार्थी वाढल्याचा डंका पिटला जातो, परंतु दुसरीकडे जी मुले शिकत आहेत आणि जी मुले अशाप्रकारचे साहित्य मिळणार म्हणून प्रवेश घेत आहेत, त्यांना शाळा सुरु झाल्यानंतरही जर हे साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही तर मुलांनी शिकायचे कसे हा प्रश्न आहे.

या मुलांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या 27 शालेय वस्तूंपैंकी काही वस्तूंच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ते प्रस्ताव प्रशासकांच्या मान्यतेसाठी पाठवल्याची माहिती मिळत आहे. परंतु अद्यापही दप्तराची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या सर्व वस्तूंच्या खेरदीप्रमाणे फेब्रुवारीत दप्तरांसाठीही निविदा मागवली होती, परंतु फेब्रुवारीपासून ते जूनपर्यंत केवळ निविदेबाबत शुद्धीपत्रके जारी केली जात आहेत. अगदी 3 जूनपर्यंत तब्बल 14 शुद्धीपत्रके या दप्तर खरेदीबाबत काढण्यात आली आहेत. ही शुद्धीपत्रके केवळ सरकारमधील महापालिकेत सत्ता असलेल्या एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीला कंत्राट देण्यासाठी हा खटाटोप केला गेला आहे. या मंत्री महोदयांच्या उद्योगामुळे महापालिकेला 14 वेळा शुद्धीपत्रके काढावी लागली असून यामुळे महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाची अधिकारीही या दबावापुढे हतबल ठरले आहेत. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतर्गत एससी आणि एसटी वर्गाला 20 टक्के राखीव काम  देण्यासाठीची ही शुद्धीपत्रके होती. यामध्ये जो कोणी कंत्राटदार या दत्पराच्या कंत्राटासाठी पात्र ठरेल, त्यातील 20 टक्के दप्तरांचा पुरवठा करण्याचे काम या संस्थेला देण्यासाठी वारंवार निविदेमध्ये सुधारणा केल्या. ज्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब होऊन मुलांना दत्पर मिळण्यास दिवाळी उलटून जाणार आहे. सदर दप्तरे ही जर मुलांना दिवाळीनंतर मिळणार असतील मुलांनी शाळेत काय घेऊन जावे आणि आपण जे शालेय साहित्य देणार आहात ते कशातून शाळेत आणावे हा प्रश्न आहे.

मुलांना ही दप्तरे वेळीच मिळणे आवश्यक आहे, परंतु प्रशासनाने केवळ कुणाच्या दबावाखातर काम केल्यामुळे दप्तरे मिळण्यास विलंब होणार आहे. यामध्ये जर सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांतर्गत काम  एखाद्या संस्थेला द्यायचे असेल तर ते यापूर्वीच करायला हवे होते, निविदा काढल्यानंतर त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याने मुलांना नियोजित वेळेत दत्परे मिळणार नाही आणि यासाठी एक जर दोन कंपन्या नेमल्या तर त्या दत्पराच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या सर्व विलंबाबाबत त्वरीत चौकशी करुन निविदा प्रक्रिया पाडावी आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संस्थांना निविदेत सामावून घेण्याचे धोरण नसल्याने त्यासाठी धोरण जाहीर करण्यात यावे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget