एक्स्प्लोर
मुंबईच्या महापौरांची निवड ‘अशी’ होईल !
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार आहे. 8 मार्च रोजी दुपारी 12 महापौरांची निवड केली जाईल. 4 मार्चला महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 8 मार्चला म्हणजे महापौरपदाच्या निवडीपूर्वी काही वेळ अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल.
कशी असेल महापौर निवडीची प्रक्रिया ?
सर्व नवीन नगरसेवकांच्या उपस्थितीत महापालिका सभागृहामध्ये पिठासीन अधिकारी म्हणजेच महापौर स्नेहल आंबेकर या महापौरपदासाठी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांची नावे वाचून दाखवतील.
त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15-20 मिनिटे वेळ दिला जाईल. मग महापौर पदाच्या शर्यतीतील उमेदवारांची क्रमानुसार नावे पुकारली जातील.
नाव पुकारल्यानंतर त्याला मत देण्यासाठी समर्थक नगरसेवकांना हात वर करावे लागतील.
त्याच बरोबर प्रत्येक समर्थक नगरसेवकाला कुणाला पाठिंबा आहे, हे विचारून त्याला उमेदवाराच्या नावापुढे सही करावी लागेल.
या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ शूटींग केले जाईल.
अशा प्रकारे सर्व उमेदवारांची नावे पुकारून त्याला असलेल्या समर्थक नगरसेवकांची संख्या मोजली जाईल.
इथं विधानसभेप्रमाणे सत्तेसाठी मॅजिक फिगर गाठण्याची गरज नसल्यानं सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार महापौर म्हणून घोषित केला जाईल.
यानंतर सध्याचे महापौर नव्या महापौरांच्या हाती सूत्रे सोपवतील.
संबंधित बातम्या :
मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार
महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement