एक्स्प्लोर

धरण उशाला अन् कोरड घशाला, मुंबईलगतच्या अनेक गावपाड्यांवर जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

शहापूर, कसारा परिसरातील 220 गाव पाड्यांवर पाण्याची समस्या आहे. विशेष म्हणजे या भागात चार मोठी धरणं आहेत. पाणी डोळ्याने दिसतंय पण प्यायला मिळत नाही. धरण उशाला अन् कोरड घसाला अशी अवस्था या गावकऱ्यांची झाली आहे.

शहापूर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून रोजच्या उदरनिर्वाहासोबतच आता पाणीटंचाईचे संकटही त्यांना भेडसावते आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर व कसारा भागातील जनतेचं घसा मात्र अजूनही कोरडाच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात भातसा ,तानसा,वैतरणा, मोडकसागर सारख्या महाकाय जलाशयांच्या जलसंपत्तींचा ठेवा उशाशी असतानाही येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील शहापूर , कसारा माळ, विहिगाव, ढेंगणमाळ, सुसरवाडी, वशाळा, साठगाव, आपटे गावासह 220 गाव पाड्यांवर भीषण पाणी टंचाई आहे. विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत. काही विहिरींमध्ये दगडाच्या फटीतून थेंब थेंब पाणी विहिरीत जमा होते आणि एक हंडा पाणी साचायला जवळपास एक ते दोन तास लागतात. विहिरीतील पाणी खोल भागात असल्याने जीव धोक्यात घालून फक्त एक हंडा पाण्याकरता महिला व पुरुष विहिरीमध्ये उतरतात. तसेच काही ठिकाणी विहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोरीच्या मदतीने खेचून पाणी काढलं जातं. त्यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत. शहापूर तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागल्याने तालुक्यातील 220 गाव पाड्यांवर फक्त 35 टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे काही गाव पाड्यांना 2 ते3 दिवसाआड टॅंकरने पाणी मिळते.  तर काही गाव पाड्यांना टँकरचे पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे पाणी आणण्यासाठी येथील महिला 3 ते 4 किलोमीटर जीव धोक्यात घालून डोंगराळ भागातून खाली उतरतात. तसेच रेल्वे रूळ व महामार्गावरून पायपीट करतात. एक हंडा पाण्यासाठी रात्रभर येथील महिला रांगा लावून बसलेल्या असतात. दगडाच्या फटीतून झऱ्याप्रमाणे थेंब-थेंब पाणी साचल्यावर ते पाणी वाटीने भरले जाते. विशेष म्हणजे या भागात चार मोठी धरणं आहेत. पाणी डोळ्याने दिसतंय पण प्यायला मिळत नाही. धरण उशाला अन् कोरड घसाला अशी अवस्था या गावकऱ्यांची झाली आहे. नेतेमंडळींचे अनेक दौरे या भागात होत असतात. अनेक आश्वासने दिली जातात. परंतु ही आश्वासने पूर्ण मात्र कधी झाली नाहीत, अशी गावकऱ्यांची भावना आहे. एवढा भीषण दुष्काळ पाहूनही प्रशासन वर्षानुवर्ष झोपेचं सोंग का घेत आहे? असा सवाल गावकरी करत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget