एक्स्प्लोर

Mumbai rain : अपघात नव्हे तर बेजबाबदार यंत्रणेकडून 'घातपात', उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Mumbai Woman Falls Into Manhole : परतीच्या पावसानं मुंबईत पुन्हा दाणादाण उडवलीय. त्याचमुळे एका महिलेचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Mumbai Woman Falls Into Manhole : मुंबई म्हणजे अखंड धावणारी मायानगरी. याच मायानगरीत मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. रेल्वेचे ट्रॅक पाण्याखाली बुडाले, रस्त्यांना तलावांचं स्वरूप आलं. कमरेइतक्या पाण्यातून मुंबईकरांना वाट शोधावी लागली. अशीच वाट शोधताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमल गायकवाड त्यांचं नाव. सिक्युरिटी गार्डची नोकरी करत त्या कुटुंबाचं पोट भरत होत्या. त्यांच्या कुटुंबात तरी कोण? तर फक्त आजारी पती. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पतीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. खरंतर, विमलताईंचा हा अपघात झालेला नाही, तर यंत्रणेने केलेला हा घातपातच म्हणायला हवा. 

मुंबई एक असं शहर जे झोपत नाही असं म्हणतात. पण याच मुंबईत राहणारा मुंबईकर हातावर फक्त घड्याळ नाही तर मृत्यूही बांधून फिरतो. परतीच्या पावसानं मुंबईत पुन्हा दाणादाण उडवलीय. त्याचमुळे एका महिलेचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय. 

रस्ता क्रॉस करताना मॅनहोलमध्ये पडल्या

मुंबईच्या उपनगरांमध्ये बुधवारी अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं होतं. गाड्या बंद पडत होत्या. अशा परिस्थितीमध्ये विमल गायकवाड आपलं काम संपवून सिप्झ कंपनीतून घराच्या दिशेनं निघाल्या. पवईच्या मिलिंद नगरला असणाऱ्या घराच्या दिशेनं जात असताना त्यांनी रस्ता क्रॉस केला आणि अचानक काहीही कळायच्या आत त्या उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या.

नाका-तोंडात पाणी गेलं होतं 

जागोजागी मेट्रोची कामं सुरू असल्यानं तिथे उघड्या राहिलेल्या या मॅनहोलनं विमल गायकवाड यांचा बळी घेतला.हा अपघात इतका भयंकर होता की पडल्यानंतर त्या सुमारे दीडशे मीटर वाहून गेल्या. कुणीतरी मॅनहोलमध्ये पडलं अशी बातमी मिळताच तातडीनं अग्निशमन विभागाचं पथक दाखल झालं. त्यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी विमल यांना बाहेर काढलं आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नाकातोंडात पाणी जाऊन आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता. 

विमल गायकवाडांचे कुटुंब उद्ध्वस्त

45 वर्षीय विमल गायकवाड या सिप्झमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करायच्या. त्यांना कोणतंही अपत्य नव्हतं. त्यामुळे पतीच्या आजारपणामुळे नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायच्या. मात्र त्यांच्या जाण्यानं एक कुटुंबच उद्ध्वस्त झालंय. हा अपघात नसून ही शांत डोक्यानं घडवून आणलेली हत्याच आहे असा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेली मुंबईतील ही पहिलीच घटना नाही. मात्र इतक्या घटना वारंवार घडल्यानंतरही प्रशासनाला अजूनही जाग कशी येत नाही हा खरा प्रश्न आहे. विमल गायकवाड यांच्या मृत्यू प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत अशा प्रकरणात जबाबदार असणाऱ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून शिक्षा होणार नाही, तोवर विमल यांना न्यायही मिळणार नाहीच.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारणSpecial Report | Disha Salian | आरोपांना ड्रग्जची 'दिशा', आदित्य ठाकरेंविरोधात स्फोटक आरोपRajkya Shole | Prashant Koratkar | कोरटकरचा आका कोण?महिनाभर पोलिसांना गुंगारा,कोरटकरला आसरा  कुणाचा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Sanjay Raut Kunal Kamra :  कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Embed widget