एक्स्प्लोर

'सामन्यात खूप, विधीमंडळात चूप', सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपची घोषणाबाजी

स्वातंत्र्यावीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात भाजपने जोरदार घोषणाबाजी आणि फलकबाजी केली. तत्पूर्वी काँग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस अपेक्षेप्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन तापलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षाने मांडलेला गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. त्यानतंर विरोधकांनी सभागृहात निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या. यानंतर गौरव प्रस्तावाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. 'सामन्यात खूप, विधीमंडळात चूप' अशा घोषणा यावेळी आमदारांनी दिल्या. तसंच सावरकर यांचा गौरव करायला शिवसेनेला लाज वाटते का? असा सवालही फडणवीसांनी विचाारला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली. मग त्यांच्या गौरव ठरावाला सरकार विरोध करणार का, असा उलट प्रश्नही फडणवीसांनी सरकारला केला. दरम्यान, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर भाजप आमदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवली आणि त्यांना आदरांजली वाहिली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त  आज सरकारकडून प्रतिमा ठेवण्यात आली नव्हती. दुसरीकडे सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. बाबाराव चौकातून या यात्रेला सुरुवात झाली. सावरकरांचा मुद्दा विधानसभेत गाजला! शिदोरी मासिकावर बंदी घाला : देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस संचालित 'शिदोरी' या मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली. या मासिकात सावरकरांविषयी कायम आक्षेपार्ह लिखाण आणि अपशब्द वापरले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. फडणवीसच सावरकरांचा अपमान करत आहेत : जयंत पाटील विरोधकांकडून विशेषत: देवेंद्र फडणवीस सावरकरांवरुन सत्ताधाऱ्यांविरोधात टीका करत होते. स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी 'शिदोरी' मासिकातील काही दाखले दिले होते. त्यावरुन जयंत पाटलांनी ही टीका केली. 'शिवसेना सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलीय' सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली आहे. शिवसेनेला इतकं लाचार झालेलं कधीही पाहिलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे, हे जनता विसरणार नाही, असंही ते म्हणाले. ...तर मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करेन : नितेश राणे मला सावरकरांबद्दल जास्त माहिती नसेल पण सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर माझं मत बदललं आहे. माझ्या आधीच्या ट्वीटचा उल्लेख माझ्यावर प्रेम करणारे शिवसेनेचे नेते वारंवार करत आहे. आधीच्या ट्वीटबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. तसंच जर मुख्यमंत्र्यांनी सावरकारांचा गौरव प्रस्ताव मांडला तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन, असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. सावरकरांच्या भारतरत्नांमध्ये अडचण काय आली? : अजित पवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान नाकारता येत नाही असं म्हणत अजित पवार यांनी सर्वांचं एकमत असेल तर चर्चेला हरकत नसल्याचं म्हटलं. तसंच सावरकर यांचे अनेक स्मृतिदिन आले. आज पहिल्यांदाच आला नाही. सावरकर हे थोर देशभक्त आहेत. त्यांना आदरांजली अर्पण करतो. सभागृहात हा प्रस्ताव मांडताना काय राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात माहित नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत पंतप्रधानांना दोन वेळा पत्र दिलं. पण मग अडचण काय आली, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget