एक्स्प्लोर

पदाभार स्विकारल्यानंतर अशोक चव्हाणांचा पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या 'त्या' पित्याला

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयातील कार्यालयात जाऊन आपला पदभार स्विकारला. आपल्या पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर चव्हाण यांनी पहिला फोन लाडक्या लेकीच्या पित्याला केला.

मुंबई : मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात आपला पदाभार स्विकारून कामकाजास प्रारंभ केला. त्यानंतर अशोक चव्हाणांनी पदाभार स्विकारल्यानंतर पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पावलांनी आपल्या गाडीची पूजा करणाऱ्या पित्याला लावला. या पित्याचा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल होत आहे.

अशोक चव्हाण यांनी कालच त्यांच्या व्हॉट्स अॅपवर आलेला एक टिकटॉकचा व्हिडीओ ट्वीट केला होता. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या नागेश पाटील यांचा हा व्हिडीओ होता. त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती.

लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडीओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्वीटर आणि फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या. अशोक चव्हाण यांनी ट्वीट करताना लिहिलं आहे की, 'मोबाईलवर हा व्हिडीओ नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय. दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल.'

अशोक चव्हाण यांची ट्विटर व फेसबुकवरील ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. हा टिकटॉक व्हिडीओ तयार करणारे नागेश पाटील यांच्यापर्यंतही ती पोहोचली. रात्री उशिरा त्यांनी ट्विटरवरून चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. चव्हाणांनी सकाळी तो ट्वीट पाहिला. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील कार्यालयात बसण्याचा आज त्यांचा पहिलाच दिवस होता. कार्यालयात पूजा करून स्थानापन्न झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिला फोन नागेश पाटील यांनाच लावला.

नागेश पाटील हे वाहनचालक असून, ते पुण्याला खासगी नोकरी करतात. चव्हाण यांच्या ट्वीटला रात्री उशिरा उत्तर दिल्यानंतर सकाळीच त्यांचा फोन आल्याने ते देखील भारावून गेले होते. नागेश पाटील यांच्याशी केलेल्या संभाषणात चव्हाण यांनी या व्हिडीओ मागील भावनेचे कौतूक केले. त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आणि कोल्हापूर किंवा पुण्याला आल्यावर नक्की भेटू, असे आश्वासनही दिले.

महत्त्वाच्या बातम्या

निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 

व्हिडीओ

Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget