एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन
मराठी भावसंगीतातील शुक्रतारा निखळल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी अरुण दाते यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या काही दिवसांपासून अरुण दाते यांची प्रकृती खालावली होती. सध्या अरुण दाते मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते. रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील कांजुरमार्गमधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भावसंगीतातील शुक्रतारा निखळल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
शुक्रतारा मंदवारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी यासारखी असंख्य गाणी अरुण दाते यांनी अजरामर केली होती. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते हे त्रिकूट प्रचंड गाजलं.
दोनच दिवसांपूर्वी अरुण दातेंचा 84 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
भावगीत सम्राट अरुण दाते यांची गाजलेली गाणी
अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 रोजी झाला होता. अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. अरुण दाते इंदूरजवळच्या धारमध्ये कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले.
अरुण दातेंनी 1955 पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचं संगीत यांनी सजलेल्या 'शुक्रतारा मंदवारा...' या गाण्यातून अरुण दाते खऱ्या अर्थाने नावारुपास आले. 1962 मध्ये त्यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली होती.
28 वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिलं.
2010 पर्यंत अरुण दाते यांचे 'शुक्रतारा' या मराठी भावगीत कार्यक्रमाचे अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बमही लोकप्रिय आहेत.
अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत अनेक द्वंद्वगीतं गायली आहेत.
अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावे लिहिलेलं आत्मचरित्र 1986 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. 2016 मध्ये हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement