Vasai : परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धक्षेत्रात पाठविणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर सीबीआयने, त्याची धागेदोरे वसईत (Vasai) असल्याचं उजेडात आणलं आहे. सीबीआयच्या (CBI) पथकाने गुरुवारी (दि.7) वसईत एका घरावर धाड टाकत तब्बल सहा तास चौकशी केली होती. 


सुफियान आणि पूजा सीबीआयच्या ताब्यात 


दुबईत आपलं नेटवर्क चालवणा-या मुख्य सुञधार फैजल खान उर्फ बाबा हा वसईच्या हातीमोहल्ला येथे गौलवड या परिसरात मागील आठ ते दहा वर्षापासून आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या समोरील सोसायटीत त्याला मदत करणारा त्याचा साथिदार सुफियान दारुगर आणि त्याची पत्नी पूजा दारुगर ही साई आशीर्वाद या सोसाटीत राहते. सुफियानच्या घरी काल गुरुवारी दुपारी चार वाजता सीबीआयच पथक वसई पोलिसांच्या मदतीने धाड मारली होती. दुपारी चार ते दहा वाजेपर्यंत घरातील लोकांशी त्यांनी चौकशी केली. काही डॉक्युमेंट ही घेवून गेले. सुफियान आणि पूजा सीबीआयच्या पथकाच्या हाती लागले नाही. 


युट्यूब चॅनल वरून परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन


फैजल हा बाबा ब्लॉग नावाच्या युट्यूब चॅनल वरून परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन तो भारतीय तरुणांना देत होता. सोफियांन आणि पूजा हे पती पत्नी भारतीय तरुणाचे कागदपत्र घेवून ते फैजलला पाठवत असल्याचं समोर आलं आहे. 


16 जणांना रशिया-युक्रेन युद्धात पाठवलं 


फैजल व्हॉटसअपद्वारे एबीपी माझाशी बोलताना म्हणाला की, गुजरात आणि हैदराबाद येथील मयत झालेल्या तरुणांनी त्याला शेवटपर्यंत त्यांचे कारारपञ दिले नाही. आपण 35 जणांना पाठवले असून, त्यांतील 16 जणांना रशिया- युक्रेन युध्दक्षेञात पाठवलं आहे. तर 6 जणांना त्यांनी आतापर्यंत तेथून बाहेर काढलं आहे. यात आता भारत सरकारने बाकीच्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचलंत का?


मोठी बातमी : मुंबईची जागा सोडली पण कल्याण-ठाण्यासाठी शिंदे आग्रही, अजित पवार गटाला एक अंकी जागा, तिकीट कापलेल्या खासदारांचंही ठरलं!