उल्हासनगर : उल्हासनगरचा रोशन देशमुख 'युपीएससी' स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे . आई अंगणवाडी सेविका आणि रेल्वेत कामाला आहेत. सामान्य परिस्थिती असूनही असामान्य यश संपादन केल्याने तो कौतुकाचा विषय बनला आहे. रोशन देशमुखने यंदाच्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कुटुंबियांच्या मान उंचावली आहे.
चिकाटी, सातत्य आणि संयम हा युपीएससी उत्तीर्ण होण्यामागचा गुरुमंत्र
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा आज निकाल लागला. चिकाटी, सातत्य आणि संयम हाच युपीएससी उत्तीर्ण होण्यामागचा गुरुमंत्र असल्याचे रोशन म्हणतो. रोशनचे वडिल रेल्वेमध्ये कामाला आहेत तर आई अंगणवाडी सेविका आहे. प्रशासकीय सेवेत आपण क्लास 1 अधिकारी होऊ, असे स्वप्न बाळगले आणि ते आज पूर्ण होताना दिसतंय म्हणून आजचा दिवस आनंदाचा असल्याचं रोशन म्हणतो.
मूळ उल्हासनगरचा रोशन देशमुखने आपली नोकरी करत चौथ्या प्रयत्नमध्ये हे यश मिळवलं. रोशन एअर इंडियामध्ये कामाला आहे. मात्र, कुठेही खचून न जाता युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं हे ध्येय रोशन ने ठरवलं होतं. एस सी पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. इंजिनिअरिंगमध्ये असतानाच युपीएससी परीक्षेची तयारीला सुरवात केली होती. मात्र, यावर्षीच्या परीक्षेत यश मिळेल असा आत्मविशास रोशनला होता
रोज 8 ते 10 तास अभ्यास करत त्यात सातत्य ठेवणे हाच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी गुरू मंत्र असल्याचं रोशन सांगतो. युपीएससी परीक्षेत पहिल्या दोन प्रयत्नात रोशन पूर्व परीक्षा सुद्धा उत्तीर्ण होऊ शकला नाही. मात्र, तो कुठेही खचला नाही आणि त्याने आपला अभ्यास सुरू ठेवत यावर्षीच्या परीक्षेत त्याने परीक्षा उत्तीर्ण करण्याचा ध्येय पूर्ण केलं.
संबंधित बातम्या :