Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 318 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी वीस रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 150 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2238 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,412 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2238 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.026% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2238 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 252 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 393 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 17, रायगड 94, पालघर 36, नागपूर 20, चंद्रपूर 10 आणि रत्नागिरीमध्ये 14 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3131 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात नव्याने आढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या देखील पाचशेपार आहे. सोमवारी राज्यात 431 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 297 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील कोरोना संसर्गातील चढउतार कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या