एक्स्प्लोर

एनजीओच्या नावाखाली अपंगांना भीक मागायला लावली, महिलांनी मॅनेजरला चोपले

नालासोपाऱ्यात कळंब, राजोडी, वसई पश्चिम या परिसरातील बंगल्यात जाऊन, संस्थेला डोनेशनच्या नावाखाली अपंग मुला-मुलींकडून दारोदार भीक मागवून डोनेशन घेतलं जात होतं.

वसई : चाईल्ड हेल्प फाउंडेशनच्या नावाखाली अपंग मुलामुलींना भीक मागायला लावून फंड गोळा करायला लावणाऱ्या संस्थेचा नालासोपाऱ्यात भांडाफोड झाला आहे. डोनेशनच्या नावाखाली दिवसाला हजार ते दीड हजार रुपये गोळा नाही केले, तर अपंग मुलामुलींना बेदम मारहाण केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पीडित मुलीच्या तक्रारीनंतर उघड झाले आहे. याबाबत मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अमन पांडे या संस्थेच्या मॅनेजरला अटक केले आहे. प्रिसीला इम्यानियुल या 20 वर्षाच्या अपंग असलेल्या तरूणीच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास आता तुळींज पोलीस करत आहेत. प्रिसीलाचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. वडील निवृत्त आहेत तर आई मयत झाली आहे. आपल्या वडिलांना आपला हातभार लागावा म्हणून मागच्या 15 दिवसांपासून तिने नालासोपाऱ्यातील चाईल्ड हेल्प फाउंडेशन या संस्थेत काम सुरू केलं होतं. तिला तिथल्या अमन पांडे या मॅनेजरने 8 हजार रुपये पगार देण्याचे आश्वासनही दिलं होतं. त्याप्रमाणे ती या संस्थेत काम करीत होती. पण ती कामावर हजर झाल्यानंतर तिला चाईल्ड हेल्प फाउंडेशनसाठी डोनेशन गोळा करण्यास सांगितले. नालासोपाऱ्यात कळंब, राजोडी, वसई पश्चिम या परिसरातील बंगल्यात जाऊन, संस्थेला डोनेशनच्या नावाखाली अपंग मुला-मुलींकडून दारोदार भीक मागवून डोनेशन घेतलं जात होतं. दिवसाला हजार ते दीड हजार रुपये आणि सुट्टीच्या दिवशी तर 2000 हजार रुपये आणायचे अशी सक्तीच केली जात असल्याचे प्रिसीलाने तक्रारीत सांगितले आहे.  जर पैसे कमी आणले तर मॅनेजर अमन पांडे हा बेदम मारहाण करत होता. परवा या पीडित मुलीने कमी पैसे आणल्यामुळे पांडे याने पीडित प्रिसीलाला हॉकीस्टिकने बेदम मारहाण केली. अपंग मुलीला मारहाण झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कळल्यावर आज महिलांनी या संस्थेच्या कार्यालयात घुसून, मॅनेजरला बेदम मारहाण करून त्याला तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करून अमन पांडे याला पोलिसांनी अटक केले आहे. तर संस्थाचालक फंड कशासाठी गोळा करीत होता? अपंग मुलाची खरंच पिळवणूक होत होती का? याचा तपास आता तुळींज पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Protest : हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, फडणवीसांच्या डोक्यावर खापर फुटेल; आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार, व्हॅनवर चढून व्हॅन जाग्यावर अडवली, अनिल परबही भडकले...
हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, फडणवीसांच्या डोक्यावर खापर फुटेल; आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार, व्हॅनवर चढून व्हॅन जाग्यावर अडवली, अनिल परबही भडकले...
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
Embed widget