एक्स्प्लोर

"पाकिटमार आहात तुम्ही" उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : "पाकिटमार आहात तुम्ही" या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. भांडुपमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. शिवसैनिकांचं मुंबईशी रक्ताचं नातं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजप शिवसेनेवर पारदर्शक नसल्याचा आरोप करतं, पण आरोप करा, मात्र आधी स्वत:कडे बघा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर पलटवार केला आहे. तसंच नोटाबंदी हे भाजपनं लादलेलं संकट असल्याचाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. भांडुपमधील नागरिकांसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच शाळकरी मुला-मुलींसाठी बेस्ट बसचा प्रवास मोफत करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच योजना आणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
  • बंगारू लक्ष्मण एक लाख रुपयांची लाच घेत होते ,इतक्या खालच्या पातळीला तुमचा अध्यक्ष गेला - उद्धव ठाकरे
  • पाच वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते , आता 'ढुंडो ढुंडो रे साजना ' अशी त्यांची अवस्था झाली आहे - उद्धव ठाकरे
  • शिवसेनेच्या अंगावर याच, एकदाच काय तो फैसला होऊ द्या - उद्धव ठाकरे
  • का 114 जागा देऊ ,मरमर माझा शिवसैनिक मरतो, पाच वर्षे काम करतो ,अंगाला एक डाग लागू देत नाही.. तुमच्या घशात जागा घालायच्या? उद्धव ठाकरे
  • ज्या पक्षाचा अध्यक्ष लाच घेताना पकडला गेला त्या पक्षाकडून पारदर्शकता का ऐकून घेऊ.. उद्धव ठाकरे
  • नोटाबंदी हे भाजपने लादलेलं संकट - उद्धव ठाकरे
  • नोटबंदी फटक्यात लोक बेरोजगार झाले ,कोण देणार नोकरी ,कसं भरून निघणार नुकसान - उद्धव ठाकरे
  • पाकिटमार आहात तुम्ही ... उद्धव ठाकरे नोटबंदी वर खरमरीत टीका!
  • नोटाबंदीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला - उद्धव ठाकरे
  • नोटबंदी वरून उद्धव ठाकरे यांची पुन्हा टीका - अनेकजण रांगेत उभे राहिले गेले ,किती दहशतवादी हल्ले थांबले ,काळा पैशावर रोख नाही - उद्धव ठाकरे
  • जन्माला येण्याआधी मुलाचा जीव गेला , तुमचे अच्छे दिन काय चाटायचे आहेत का? उद्धव ठाकरे
  • नोटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, काळा पैसा थांबला नाही - उद्धव ठाकरे
  • कोस्टल रोड आठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार ,स्वतःच्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा - उद्धव ठाकरे
  • शाळकरी मुला-मुलींसाठी बेस्ट बसचा प्रवास मोफत करणार - उद्धव ठाकरे
  • शिवसेनेचा रक्तदानाचा विक्रम कुणीही मोडला नाही - उद्धव ठाकरे
  • शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच योजना आणतोय - उद्धव ठाकरे
  • मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर मालमत्ता कर रद्द करणार - उद्धव ठाकरे
  • मुंबई महापालिकेचं वीजनिर्मीती केंद्र कुणासाठी अडवलंय, ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं - उद्धव ठाकरे
  • मुंबई महापालिका स्वत:चं वीज निर्मिती केंद्र उभारणार - उद्धव ठाकरे
  • कोस्टल रोड आठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार ,स्वतःच्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा - उद्धव ठाकरे
  • आरोप करा, मात्र, आधी स्वत:कडे बघा - उद्धव ठाकरे
  • मध्य वैतरणा धरण सर्वात जलद गतीने बांधलं - उद्धव ठाकरे
  • मुंबईकरांना पाणी कमी पडू दिलं नाही - उद्धव ठाकरे
  • गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरं तुंबली, पण मुंबईत पाणी तुंबलं नाही - उद्धव ठाकरे
  • मुंबईशी रक्ताचं नातं - उद्धव ठाकरे
  • काही जणांना सांगावं लागतं की आम्ही मुंबईकर - उद्धव ठाकरे
  • भाजपने आम्हाला पारदर्शकता शिकवू नये - उद्धव ठाकरे
  • आज जे हुतात्मा चौकात गेले होते ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
  • संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
  • ज्या ज्या वेळी संकटं येतात, त्या त्या वेळी माझे शिवसैनिक धावून जातात - उद्धव ठाकरे
  • सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल भांडुपकरांना देणार - उद्धव ठाकरे
  • भांडुपमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार - उद्धव ठाकरे
  • महाराष्ट्राचा एक इंच तुकडाही तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
  • भाजपच्या पारदर्शकतेची मी वाट पाहतोय - उद्धव ठाकरे
  • चांगल्या कामाचं श्रेय देणार नाही खुसपट मात्र काढणार - उद्धव ठाकरे
 

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दुष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Embed widget