मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंची आदित्यसेना अन् अभाविपमध्ये सामना, शिंदेंच्या युवासेनेचा उमेदवारच दिसेना
Senate Election: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या दहा जागांसाठीचा बिगुल वाजले आहे. मुंबई विद्यपीठाच्या निवडणुका 22 सप्टेंबरला होणार आहे.
![मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंची आदित्यसेना अन् अभाविपमध्ये सामना, शिंदेंच्या युवासेनेचा उमेदवारच दिसेना Uddhav Thackeray Yuva Sena and ABVP clash in Mumbai University Senate elections Marathi News मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंची आदित्यसेना अन् अभाविपमध्ये सामना, शिंदेंच्या युवासेनेचा उमेदवारच दिसेना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/b4758b5b4c36f91796079561aad6967b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत (Mumbai University Senate Election) ठाकरेंची युवासेना (Uddhav Thackeray Yuvasena) विरुद्ध अभाविप (ABVP) असा थेट सामना रंगणार आहे. युवासेना आणि अभाविपकडून सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर छात्रभारतीने चार, मनसेनं (MNS) एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. शिंदेंच्या युवासेनेनं एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीत उतरवला नाही. 22 सप्टेंबरला सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या दहा जागांसाठीचा बिगुल वाजले आहे. मुंबई विद्यपीठाच्या निवडणुका 22 सप्टेंबरला होणार आहे. सोमवारी (12 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची वेळ होती. यामध्ये युवासेना आणि अभाविपकडून सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सिनेट निवडणुकीत सर्व जागांसाठी थेट लढत युवासेना विरुद्ध अभाविप होणार आहे. याशिवाय मनसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी अर्ज भरला असून छात्र भारती संघटने कडून चार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तर अपक्ष म्हणून चार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमेदवारांची नावे
- हर्षद भिडे
- प्रतीक नाईक
- रोहन ठाकरे
- प्रेषित जयवंत
- जयेश शेखावत
- राजेंद्र सायगावकर
- निशा सावरा
- राकेश भुजबळ
- अजिंक्य जाधव
- रेणुका ठाकूर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक युवा सेना उमेदवारांची नावे
- प्रदीप सावंत
- मिलिंद साटम
- परम यादव
- अल्पेश भोईर
- किसन सावंत
- स्नेहा गवळी
- शीतल शेठ
- मयूर पांचाळ
- धनराज कोहचडे
- शशिकांत झोरे
तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं लागणार?
सीनेटच्या निवडणुकीतुन तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे स्पष्ट होईल सिनेट निवडणुकीत जो बाजी मारेल त्या मुंबई महानगरपालिकेत तरूणांचा पाठिंबा मिळेल असं हे समीकरण आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे एकत्र येत असल्यानं मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे.
हे ही वाचा :
HSC SSC Exam Dates : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, बोर्डाकडून 2025 च्या परीक्षेच्या आयोजनात मोठा बदल, जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)