मुंबई: वैनगंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच गोदावरीचे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक असणारा निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प आणि गोदावरी खोऱ्यातून समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचना दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीही उपस्थित होते.


वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी नळगंगा खोऱ्यात नेण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावर अमरावती आणि नागपूर विभागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात यावा, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


राज्यातील 104 प्रकल्प दहा ते वीस टक्के प्रकल्प अपूर्ण आहेत. हे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे सांगितले. तसेच जलसंपदा विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.


गोदावरी नदीच्या खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी प्रकल्पही अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे शेतीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले जावे. यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्या


Eknath Shinde : स्वागत, सजावट आणि पूजा... मंत्रालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कामकाजाला प्रारंभ


Maharashtra : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, 'मविआ' सरकारने केलेल्या बदल्या रोखल्या