एक्स्प्लोर

तिहेरी तलाक प्रकरणातील अटकपूर्व जामिनावर उद्या फैसला

तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी आपला निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

मुंबई : तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी आपला निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. कायद्यानं गुन्हा ठरवल्या नंतर या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मागण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग असावा. वसईतील रहिवासी असलेल्या इन्तेखाब आलम मुन्शी यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. कायद्यानं बंदी घातलेल्या तिहेरी तलाकचा वापर करत मुन्शीनं आपल्याला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत त्याच्या पत्नीनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवला. त्यामुळे आता अटकपूर्व जामिनासाठी मुन्शीनं हायकोर्टात धाव घेतली आहे. तक्रापदाराच्या मते मुन्शीनं 22 सप्टेंबरला तिहेरी तलाक दिल्याचं सांगितलं होते. तर मुन्शीचे वकील विन्सेन्ट डिसिल्वा यांनी मुन्शीकडून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यात घटस्फोटासाठी दोन नोटीसा पाठवल्या असल्याचा युक्तिवाद कोर्टापुढे केला. तर 22 सप्टेंबरला त्यानं तिसरी नोटीस पाठवली असं स्पष्ट केलं. पण सदर महिलेचे वकील अमिन सोलकर यांनी आपल्याला आधीच्या दोन नोटीस मिळाल्याच नसल्याचा दावा केला. या वर्षी मे महिन्यात मुन्शीनं त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं आणि जुलैमध्ये घटस्फोटाचा अर्ज सादर केला आहे. हा खटला सुरु असतानाच 22 सप्टेंबरला तिहेरी तलाक झाला असल्याची नोटीस सदर महिलेला मिळाली. त्यानंतर या महिलेनं 23 ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दिली. वसईतील सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात मुन्शीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यानं आता हायकोर्टात धाव घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC news: मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार
मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget