एक्स्प्लोर
भिवंडीत टोलनाका कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, वाहन चालकाला बेदम मारहाण
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील पडघा येथील टोलनाका कर्मचारी नेहमीच प्रवाशांवर दादागिरी करत असतात.

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा येथे टोलनाक्यावरील कर्माचाऱ्यांकडून वाहन चालकांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणी हा सगळा प्रकार एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. टोल कर्मचारी आणि प्रवासी यांच्यातील वाद हा नेहमीचा आहे. विषेश म्हणजे याबाबत पोलीसात कोणतीही तक्रारीची नोंद झालेली नाही. मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील पडघा येथील टोलनाका कर्मचारी नेहमीच प्रवाशांवर दादागिरी करत असतात. त्यातच या टोलनाक्यावरुन जात असलेल्या दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला. तो सोडविण्यास गेलेल्या टोलनाका कर्मचाऱ्यास वाहन चालकाने मारहाण केल्याने संतप्त झालेल्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्या वाहन चालकांना बेदम मारहाण केली. एका वाहनचालकाने या मारहाणीचा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. याबाबत पडघा पोलिसांशी संपर्क साधला असता, या घटनेबाबत कोणीही तक्रार आलेली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती दिली.
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















