एक्स्प्लोर
Advertisement
500 रुपयांत लोकलने महिनाभर कुठेही आणि कितीही वेळा फिरा!
नवी दिल्ली : आता 500 रुपयात लोकल ट्रेनने महिनाभर मुंबईत कुठेही फिरता येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे रेल्वे बोर्डाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.
रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यास 500 रुपयात महिनाभर मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या मार्गांवर किती वेळा प्रवास करता येणार आहे.
या प्रस्तावानुसार, रेल्वेतर्फे प्रवाशांना विशेष पास देण्यात येईल. या सुविधेमध्ये द्वितीय श्रेणीसाठी 500 रुपये शुल्क तर प्रथम श्रेणीसाठी 1500 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे.
दरम्यान, हा पास मासिक पासपेक्षा वेगळा असेल. मासिक पाससाठीचे शुल्क आणि या पाससाठीचे शुल्क वेगळं असेल, असं मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय सांगितलं.
गेल्या आर्थिक वर्षांत रेल्वेने रेल शिबिराचे आयोजन केलं होतं. या शिबिरात प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या होत्या. यात उपनगरीय प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे.
कसा असेल पास?
मार्ग | कालावधी | सेकंड क्लास किती रुपये? | फर्स्ट क्लास किती रुपये? |
सीएसटी-कर्जत | 1 महिना | 400 | 1670 |
सीएसटी-कसारा | 1 महिना | 500 | 1970 |
सीएसटी-पनवेल | 1 महिना | 370 | 1150 |
चर्चगेट-डहाणू | 1 महिना | 500 | 1970 |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement