एक्स्प्लोर

मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

  मुंबई : मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते कर्जत दरम्यान ब्लॉक मध्य रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचा गर्डर बदलणे, आणि पुलाच्या दुरुस्तीकामासाठी कल्याण ते कर्जत दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.15 ते दुपारी 1.53 या काळात हे काम होणार आहे. त्यामुळे कल्याणहून कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम मार्गावर जम्बो मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान सांताक्रुझ व माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सांताक्रुझ आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत कुर्ला-वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी कोणतीही लोकल सुटणार नाही. तसेच सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 वाजेपर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कोणत्याही लोकल सुटणार नाहीत. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल. मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकमुळे  लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्स्प्रेस (17222), मुंबई-तिरूनेलवेली नागरकोईल एक्स्प्रेस (16339) आणि  मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस (17031) आदी गाड्या कर्जत ते पनवेल मार्गावरून धावतील. त्यामुळे या गाड्या लोणावळा स्थानकावर 25 ते 30 मिनिटे उशिराने पोहोचतील. तर अप मार्गावरील हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस(17032), चेन्नई एक्स्प्रेस (11042) आणि कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (11014) गाड्या कर्जत-पनवेल मार्गाने प्रवास करतील. त्यामुळे कल्याण स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना दिवा स्टेशनवर उतरावे लागेल. या गाड्या अंतिम स्थानकांवर निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिराने पोहोचतील.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget