एक्स्प्लोर

Mumbai Crime: अवैध मार्गाने मुंबईत घुसलेल्या तीन बांगलादेशींना अटक, तपास सुरु

अवैध मार्गाने मुंबईत घुसलेल्या तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशानंतर डी एन नगर पोलीस ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई केलीय

Mumbai Crime News:  मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर पोलीस (Mumbai Andheri Police) ठाण्याच्या हद्दीतील जुहू गल्ली अक्सा मस्जिद परिसरात वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे दहशतवादी विरोधी पथक (Mumbai ATS) आणि डी एन नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईने या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तीनही बांगलादेशी नागरिक भारतात अवैध मार्गाने घुसून मागील सहा महिन्यांपासून वास्तव्य करत होते.

डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुहू गल्ली परिसरात तीन बांगलादेशी नागरिक अवैधपणे मागील सहा महिन्यापासून वास्तव्यास असल्याची माहिती खबऱ्यांकडून डी एन नगर पोलीस ठाण्याला मिळाली होती. यानंतर मिळालेल्या माहितीची खात्री जमा करून डी एन नगर पोलीस ठाणे आणि दहशतवादी पथकाने या बांगलादेशींना पकडण्यासाठी पथक तयार केले. डी एन नगर पोलीस आणि दहशतवादी पथकाची टीम या बांगलादेशींना ताब्यात घेण्यासाठी खबऱ्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली असता घर बंद असल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. 

खबऱ्यामार्फत मिळाली माहिती, मुंबई पोलिसांची धडक कारवाई

मात्र एक नोव्हेंबर या दिवशी तिघेही बांगलादेशी नागरिक अक्सा मस्जिद जवळील सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळ येणार असल्याचे पक्की खबर मिळाली. यानंतर पंच आणि कारवाईसाठी नेमलेली टीम अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली भगत वायरलेस रोड जवळील सार्वजनिक सुलभ शौचालय जवळ पोहोचून तीनही बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्या बंद घराची झाडाझडती करून तपासणी केली. मात्र हे तीनही आरोपी पोट भरण्यासाठी मुंबईत मागील सहा महिन्यापूर्वी दलालाच्या मदतीने कोलकत्ता आणि आगरताळा मार्गे जिथे संरक्षक कुंपण नाही अशा जंगली भागातून भारतात घुसले असल्याचे तीनही बांगलादेशी नागरिकांनी कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेले मोहम्मद जाफर बदल आलम शेख, 44 वर्ष, रेहान मोहम्मद नबी शेख, 23 वर्ष आणि मोहम्मद सोयल साबुद्दीन खान, 30 वर्ष हे तीनही आरोपी डी एन नगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहे. हे तिघेही बांगलादेश मधील नवखाली कबीरहाट भागात राहणारे आहेत.

ही बातमी देखील वाचा

महत्त्वाच्या बातम्या

सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget