एक्स्प्लोर

कामकाज करण्‍याची परवानगी असलेल्‍यांना प्रवास परवानगी पास मिळणार

सुधारित मार्गदर्शक तत्‍वानुसार कामकाज करण्‍याची परवानगी असलेल्‍यांना विभाग कार्यालय स्‍तरावरुन प्रवास परवानगी पत्र मिळणार आहे. येत्या 20 एप्रिलपासून याचे वितरण सुरू होणार आहे.

मुंबई : कोरोना विषाणू (कोविड-19) संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर, सध्‍या लागू असलेल्‍या संचारबंदीच्‍या आदेशातून ज्‍यांना कामकाज करण्‍यासाठी वगळण्‍यात आले आहे, त्‍या नागरिकांना कामाच्‍या ठिकाणी येण्‍या-जाण्‍यासाठी प्रवासाची परवानगी देण्‍याचे पत्र (पास) महानगरपालिकेच्‍या विभाग कार्यालय स्‍तरावर दिनांक 20 एप्रिल 2020 पासून दिले जाणार आहेत. त्‍यासाठी प्रत्‍येक विभागात दोन सहाय्यक विधी अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. राज्‍य शासनाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्‍वे निर्गमित केली आहेत. त्‍यामध्‍ये महाराष्‍ट्रामध्‍ये कोणत्‍या कामकाजांना परवानगी दिलेले आहे, त्‍याचे निर्देश दिलेले आहेत. त्‍याअनुषंगाने नागरिकांना कामाच्‍या ठिकाणी ये-जा करण्‍यासाठी प्रवासाची परवानगी देण्‍याचे पत्र (पास) वितरित केले जाणार आहेत. त्‍यासाठी महानगरपालिकेतील प्रत्‍येक विभागात (वॉर्ड) दोन सहाय्यक विधि अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. हे सहाय्यक विधि अधिकारी सकाळी 7 ते दुपारी 2 आण‍ि दुपारी 2 ते रात्री 9 अशा दोन सत्रांमध्‍ये कामकाज सांभाळतील. ज्‍या कार्यक्षेत्रांना लॉकडाऊनच्‍या काळात परवानगी दिलेली आहे, त्‍याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्‍वांमध्‍ये दिलेल्‍या निर्देशानुसार हे परवानगी पत्र दिले जाईल. राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित; वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात हॉटस्पॉट काही कागदपत्रांच्या आधारे मिळणार पास सहाय्यक विध‍ि अधि‍कारी हे योग्‍य ती छाननी करुन त्‍यांच्‍या स्‍वाक्षरीने पासेस वितरित करणार आहेत. नागरिकांचे कामाचे ठिकाण ज्‍या विभागाच्‍या अखत्‍यारित येते, त्‍या विभाग कार्यालयामार्फत हे परवानगी पत्र दिले जाईल. ज्‍या नागरिकांनी प्रवासाची परवानगी मागण्‍यासाठी अर्ज केलेला आहे, त्‍यांच्‍याबाबतीत असा पास देण्‍यापूर्वी, आवश्‍यक संबंधित कागदपत्रांसाठी अर्जदाराने साध्‍या कागदावर स्‍वयंघोषित हमी पत्र (self declaration) दिले तरी ते पुरेसे राहील. या सहाय्यक विधि अधिकाऱ्यांच्‍या मदतीला संबंधित सहाय्यक आयुक्‍त यांच्‍यामार्फत कर्मचारी नेमण्‍यात येतील. त्‍यासाठी कोविड 19 संबंधी यापूर्वी कामकाज पाहत नसलेल्‍या आण‍ि वसाहत/मालमत्‍ता/दुकाने व आस्‍थापना इत्‍यादी विभागातून कर्मचारी नेमण्‍याचे निर्देशही देण्‍यात आले आहेत. वितरित केलेल्‍या परवानगी पत्रांचा दैनंदिन अहवाल हा प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. ज्‍या खासगी रुग्‍णालयांना लॉकडाऊनच्‍या काळात कामकाज करण्‍यास परवागनी दिलेली आहे, अशा रुग्‍णालयातील कर्मचारी/डॉक्‍टर यांना त्‍यांच्‍या खासगी रुग्‍णालयातील प्रमुख हेच परवानगी पत्र देतील, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे. International & Domestic Flight Booking | एक जूनपासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स, तर चार मे पासून एअर इंडियाच्या काही डोमेस्टिक फ्लाईट्सचं बुकिंग सुरू

महत्त्वाच्या बातम्या

Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget