एक्स्प्लोर
मिथुन चक्रवर्तीच्या पोशाखात चोरी करणारा अखेर गजाआड

मुंबई : बोरिवलीत कुरियर बॉय बनून चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा चाहता असलेला हा चोर मिथुनच्या पेहरावातच चोरी करायचा. अमित रतुल नावाच्या या चोरावर मुंबईतल्या अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी अमितला बेड्या ठोकल्या. मूळ कोलकात्याचा असलेला अमित दहा वर्षांपूर्वी मुंबईत आला. गाण्याची हौस असल्याने लहानमोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये त्याने काम केलं. मात्र हाती पुरेसा पैसा न लागल्यामुळे त्याने चोरीचा पर्याय निवडला. मिथुन चक्रवर्तीचा मोठा फॅन असल्यामुळे मिथुनसारखी वेशभूषा करुन चोरी करायचा. कुरियर बॉय असल्याचं भासवून तो मोठमोठ्या इमारतींमध्ये शिरकाव करायचा. इमारतीत शिरल्यावर बंद असलेल्या घराचं कुलूप हातोड्याने तोडायचा. 30 सप्टेंबरला अमित अशाचप्रकारे एका घरात चोरीच्या तयारीत होता. त्यावेळी पवई पोलिसांनी त्याला अटक केली.
आणखी वाचा























