News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

दोनशेच्या नोटेसाठी ATM रिकॅलिब्रेशनचे आदेश, बँकांना खर्च....

दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: नोटाबंदीनंतर दोन हजाराच्या नोटेसाठी केलेल्या रिकॅलिब्रेशननंतर, आता पुन्हा एकदा बँकांना आपली एटीएम रिकॅलिब्रेट अर्थात करावी लागणार आहेत. दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने तसे आदेश बँकांना दिले आहेत. पण या रिकॅलिब्रेशनसाठी बँकांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. जवळपास 2 लाख 20 हजार एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी 5 ते 6 महिने लागू शकतात. नोटाबंदी, थकीत कर्ज या आणि अन्य कारणांमुळे बँका आधीच अडचणीत असल्याचं सांगत आहेत. त्यात एटीएम रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च बँकांना करावा लागणार आहे. सध्या एटीएममध्ये 100, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा मिळतात. मात्र नोटाबंदीनंतर दोनशेची नवी नोट बाजारात आली. या नोटेच्या रचनेमुळे ती नोट एटीएममध्ये मिळत नाही. ती केवळ बँकेतच मिळते. त्यामुळे ही नोटही एटीएममधून मिळावी, यासाठी एटीएमच्या रचनेत बदल करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. दोन हजारऐवजी छोट्या-छोट्या नोटा चलनात आणण्याचा बँकांचा उद्देश आहे. त्यासाठीच आरबीआय हे पाऊल उचलत आहे.  दरम्यान, एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी बँकांना किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नोटाबंदीनंतर एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा उपलब्ध झाल्याने, एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण वाढलं आहे. दोनशेच्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध झाल्याने ते प्रमाण कमी होईल, असा विश्वास आरबीआयला आहे. संबंधित बातम्या दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली!
Published at : 04 Jan 2018 08:33 AM (IST) Tags: RBI आरबीआय bank ATM एटीएम बँक

आणखी महत्वाच्या बातम्या

Mumbai News : मोठी बातमी : दोन वर्षांचा चिमुकला चौथ्या मजल्यावरुन पडला, दवाखान्यात नेताना अ‍ॅम्ब्युलन्स 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकली, वाटेतच जीव सोडला!

Mumbai News : मोठी बातमी : दोन वर्षांचा चिमुकला चौथ्या मजल्यावरुन पडला, दवाखान्यात नेताना अ‍ॅम्ब्युलन्स 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकली, वाटेतच जीव सोडला!

Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Golden Data मोठी बातमी: राज्य सरकारने 'गोल्डन डेटा' आणला, बोगस लाभार्थी रोखण्यासाठी मोठं पाऊल, नेमका डेटा काय?

Golden Data मोठी बातमी: राज्य सरकारने 'गोल्डन डेटा' आणला, बोगस लाभार्थी रोखण्यासाठी मोठं पाऊल, नेमका डेटा काय?

मुंबई अन् पुण्यात आयफोन 17 खरेदीसाठी झुंबड; ग्राहकांमध्ये हाणामारीही झाली, नेमके फिचर्स काय?

मुंबई अन् पुण्यात आयफोन 17 खरेदीसाठी झुंबड; ग्राहकांमध्ये हाणामारीही झाली, नेमके फिचर्स काय?

High Court on Pothole Deaths : रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन उच्च न्यायालयाकडून सर्व महापालिकांची कानउघडणी; एका आठवड्यात सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश

High Court on Pothole Deaths : रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन उच्च न्यायालयाकडून सर्व महापालिकांची कानउघडणी; एका आठवड्यात सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश

टॉप न्यूज़

EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबूकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार

EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबूकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार

सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 

सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 

Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?

Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?

Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  

Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार