एक्स्प्लोर
ठाण्यातील तरुणाची घोड्यावर बसून वाजतगाजत iPhone खरेदी
लग्नाच्या वरातीप्रमाणे जामानिमा करत महेशने थाटामाटात आयफोन खरेदी केला.

ठाणे : हौसेला मोल नसतं, या म्हणीचा प्रत्यय आज ठाण्यात आला. आयफोनचं नवं मॉडेल घ्यायला जाताना एका तरुणाने चक्क घोड्यावर बसून वाजत-गाजत मिरवणूक काढली. महेश पालीवाल हा 20 वर्षांचा तरुण ठाण्यातील गोकुळनगर परिसरात राहतो. महेशला आयफोनचं प्रचंड वेड आहे. त्यामुळे नव्याने लाँच झालेलं आयफोन एक्स हे लेटेस्ट मॉडेल विकत घ्यायला जाताना तो घोड्यावर बसून गेला. महेश घोडेस्वारी करत असतानाच त्याच्यासोबत काही जण बँड-बाजाही वाजवत होते. लग्नाच्या वरातीप्रमाणे जामानिमा करत त्याने थाटामाटात आयफोन खरेदी केला. ठाण्यात पहिला आयफोन एक्स घेण्याची त्याची इच्छा होती. शुक्रवारी संध्याकाळी ढोल ताशा घेऊन आणि घोड्यावर स्वार होऊन त्याने नौपाड्यातील एका दुकानातून हा फोन खरेदी केला. महेश जेव्हा स्वतः कमवत नव्हता तेव्हा त्याचे आईवडील त्याला आयफोन घेऊन देत होते. आता महेश स्वतः कमवायला लागल्याने त्याने स्वतःच्या पैशाने एक लाख दोन हजाराचा हा फोन घेतला आहे https://twitter.com/Akkibhatkar/status/926428756427845632
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























