एक्स्प्लोर
ठाण्यात ज्वेलर्सच्या दुकानात साडेअकरा लाखांचे दागिने चोरणारे वृद्ध जोडपे सीसीटीव्हीत कैद
ठाण्यात सावरकरनगरमधील 'वैभव ज्वेलर्स'मध्ये वृद्ध दाम्पत्याने हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

ठाणे : ठाण्यात खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारं वृद्ध दाम्पत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. सावरकरनगर भागातील सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दाम्पत्याने साडेअकरा लाखांच्या दागिन्यांची चोरी केली. अक्षय तृतीया आणि लग्नानिमित्त ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. शुक्रवारी दुपारी घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वर्तकनगर पोलिस या वृद्ध जोडप्यासह त्यांच्यासोबत आलेल्या अन्य एका दाम्पत्याचा शोध घेत आहेत. दोस्ती विहारमध्ये राहणारे 29 वर्षीय सराफ पौरुष जैन यांची सावरकरनगरमध्ये 'वैभव ज्वेलर्स' नावाची पेढी आहे. शुक्रवारी दुपारी एका वयोवृद्ध दाम्पत्यासह मध्यमवयीन जोडपं दागिने खरेदी करण्यासाठी पेढीत आलं. तेव्हा लक्ष विचलित करुन वृद्धाने दुकानातील वजनकाट्याखाली ठेवलेल्या दागिन्यांची पेटी उचलून वृद्ध महिलेकडील पिशवीत टाकली आणि काढता पाय घेतला. VIDEO | सराफा पेढीत वृद्ध दाम्पत्याची हातसफाई, लाखोंचे दागिने लंपास | ठाणे त्यापाठोपाठ दुसऱ्या दाम्पत्यानेही नाटक करुन पळ काढला. चोरीला गेलेल्या या पेटीमध्ये 11 लाख 61 हजार 20 रुपयांचा ऐवज असल्याचं जैन यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आणखी वाचा























