Thane News : ठाण्यातील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून दोघा कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ठाण्याच्या पाचपाखाडी भागात घडली. टाकीत तयार झालेल्या केमिकलच्या वायूने कामगार अक्षरशः तडफडले. या दुर्घटनेत दोन कामगार बचावले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. स्थानिक नौपाडा पोलीस, अग्निशमन दल आणि ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरु केल्याने दोघा कामगारांचा जीव बचावला.
लिफ्ट नसलेली पाच मजली इमारत, गच्चीत 25 फुटांवरील टाकीवर चढून जाण्यासाठी अरुंद शिडी आणि टाकीच्या झाकणावर असलेला उंच मोबाईल टॉवर अशा विविध अडचणींवर मात करत बचाव पथक आणि डॉक्टरांनी दोन कामगारांचा जीव वाचवला. दरम्यान, या घटनेला जबाबदार ठेकेदारावर कारवाई केली जाणार असून पुरेशी सुरक्षिततेची साधने नसलेल्या ठेकेदाराला काम देणाऱ्या संबंधितांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितलं की, पाचपाखाडी भागात मराठा सेवा मंडळाची ही इमारत आहे. या इमारतीतील पाण्याची टाकी साफ करण्याचं कंत्राट एका ठेकेदाराने घेतलं होतं. त्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काम सुरू केलं. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी एक केमिकल टाकलं होतं. त्यानंतर टाकी साफ करण्यासाठी दोन कामगार खाली उतरले.
या दोन्ही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केला. त्यानंतर इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बचावकार्य केलं. या चार कामगारांपैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- IPS Krishna Prakash : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं पुन्हा वेशांतर करुन यशस्वी स्टिंग ऑपरेशन, पण....!
- नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा माजी सरपंच पितापुत्रावर प्राणघातक हल्ला
- बीडमध्ये दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, शहरात दहशतीचे वातावरण
- घर नावावर करण्यासाठी चक्क न्यायाधीशांच्या बनावट सही, शिक्याचा वापर; गुन्हा दाखल